शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी ११ संशोधनांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथील विशाल बाळासाहेब पाटील यांनी एकाच दिवशी ११ संशोधनांची नोंद केल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथील विशाल बाळासाहेब पाटील यांनी एकाच दिवशी ११ संशोधनांची नोंद केल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.

विशाल पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येळापूरला, तर पदविका शिक्षण पीव्हीपीआयटी, बुधगाव येथे, पदवी शिक्षण आयओके, पुणे येथे झाले. दोन वर्षे पॉलिटेक्निक येथे प्राध्यापक म्हणून काम केले. तीन वर्षांपासून पुणे येथील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक येथे प्राध्यापक आणि संशोधन विभागामध्ये समन्वयक आहेत.

प्राध्यापक म्हणून काम करत असताना २०१८मध्ये उत्कृष्ट प्रोजेक्ट मार्गदर्शक म्हणून प्रथम पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. २०२० मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक व्हेईकल बनवली. तिला इलेक्ट्रिक व्हेईकल चॅम्पिअनशिपमध्ये सर्वात लोकप्रिय वाहन म्हणून प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी त्यांनी कृषी, यंत्र अभियांत्रिकी, उद्योग, सौरऊर्जा, जलसंशोधन, ऑटोमोबाइल अशा विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करून एकूण १७ पेटंट्सची नोंद केली आहे. ही सर्व संशोधने भारतीय पेटंट कार्यालयाच्या शासकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यापैकी ११ची पेटंट्सची एकाच दिवशी नोंद करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड‌्समध्ये विक्रमाची नोंद केली. प्राचार्या डॉ. व्ही.एस. बायकोड, प्रा. एस.पी. चाफळकर, प्रा. राहुल शेळके यांचे साहाय्य व मार्गदर्शन मिळाले.