सांगली : भारतीय जैन संघटनेमार्फत पालकमंत्री जयंत पाटील व पुणे पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांचा १० डिसेंबरला सत्कार समारंभ आयोजित केला आहे, अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
सांगलीच्या राजमती भवनात दुपारी १ वाजता माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते संस्कृत मानपत्र देऊन उद्योगपती सुभाष बेदमुथा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या यशस्वी नेतृत्वामुळे चार जागा महाआघाडीच्या निवडून आल्या. त्याबद्दल त्यांचा व अरुण लाड यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही निमंत्रित केले आहे, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.