शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय समितीत उपमहापौर गटाची बंडखोरी

By admin | Updated: June 22, 2016 00:09 IST

महापालिका : सभापती निवडणुकीत चुरस वाढली, सत्ताधारी काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजीला उधाण

सांगली : महापालिकेच्या मागासवर्गीय समिती सभापतिपदासाठी मंगळवारी उपमहापौर गटाकडून सुरेखा कांबळे यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. काँग्रेसने शेवंता वाघमारे यांना, तर राष्ट्रवादीने विद्यमान सभापती स्नेहल सावंत यांना पुन्हा रिंंगणात उतरवले आहे. सभापतिपदासाठी तीन अर्ज दाखल झाल्याने निवडीत चुरस वाढली आहे. संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेसमधील दोन्ही गटांनी कंबर कसली असून, राष्ट्रवादीनेही पुन्हा सभापतीपद पदरात पाडून घेण्याची व्यूहरचना आखली आहे. बंडखोरीमुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मागासवर्गीय समिती सभापतीची बुधवारी निवड होत आहे. या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अंतिम मुदत होती. या मुदतीत शेवंता वाघमारे, सुरेखा कांबळे, स्नेहल सावंत या तिघांनी अर्ज दाखल केले. सभापतिपदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सकाळपासूनच खल रंगला होता. गटनेते किशोर जामदार यांच्या कार्यालयात मदनभाऊ पाटील गट थांबून होता, तर उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने यांचा गट त्यांच्या कार्यालयात होता. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमधील उमेदवार ठरत नव्हता.दुपारी दोनच्या सुमारास गटनेते जामदार यांनी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व पतंगराव कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर शेवंता वाघमारे यांचा अर्ज भरण्यात आला. या अर्जावर बसवेश्वर सातपुते, कांचन कांबळे व विवेक कांबळे यांनी सूचक व अनुमोदक म्हणून सह्या केल्या. यावेळी महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील उपस्थित होते. दुसरीकडे उपमहापौर गटानेही अर्ज दाखल करण्याची तयारी ठेवली होती. या गटाकडून सुरुवातीला स्वाभिमानी आघाडीचे बाळासाहेब गोंधळी यांना रिंगणात उतरविले जाणार होते. गोंधळी यांनी अर्जही नेला होता. पण मंगळवार सकाळपासून ते गायब होते. त्यांचा भ्रमणध्वनी लागत नव्हता. गोंधळी न आल्याने शेवटच्या क्षणी सुरेखा कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत त्यांचा अर्ज भरण्यात आला. यावेळी उपमहापौर घाडगे, नगरसेवक शेखर माने, गजानन मगदूम, अनिलभाऊ कुलकर्णी, अश्विनी कांबळे उपस्थित होते. उपमहापौर गटाच्या बंडखोरीने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीने विद्यमान सभापती स्नेहल सावंत यांनाच पुन्हा संधी दिली आहे. काँग्रेसमधील संघर्षाचा सलग दुसऱ्यावर्षी फायदा उचलण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. ही गटबाजी कितपत टिकते, त्यावर सावंत यांचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)विवेक कांबळेंचा त्रागामागासवर्गीय समितीचे सदस्य तथा माजी महापौर विवेक कांबळे हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. गतवर्षी सभापती निवडीवेळी मदन पाटील यांनी बाळासाहेब गोंधळी यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा गोंधळींचा पराभव झाला होता. मदनभाऊंचा अपमान करणाऱ्यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे. मदनभाऊ आजारी असताना त्यांना सदस्यांनी त्रास दिला. आता तेच सदस्य रिंगणात उतरले आहेत. या उमेदवाराला आपण मतदान करणार नाही. प्रसंगी विरोधी उमेदवाराला मतदान करू, असे कांबळे यांनी जाहीर केले आहे. समितीतील संख्याबळाचे त्रांगडेमागासवर्गीय समितीत ११ सदस्य आहेत. त्यापैकी काँग्रेसचे सहा व राष्ट्रवादीचे चार व स्वाभिमानीचा एक असे संख्याबळ होते. पण गेल्या वर्षभरात बरीच समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यात मदनभाऊ गटाकडे चार, उपमहापौर गटाकडे चार, तर राष्ट्रवादीकडे तीन सदस्य आहेत. काँग्रेसमधील बसवेश्वर सातपुते हे उपमहापौर गटाचे मानले जातात, पण आज त्यांनी शेवंता वाघमारे यांच्यासाठी सूचक म्हणून सही केली आहे. तर राष्ट्रवादीच्या शुभांगी देवमाने यांनी उपमहापौर गटाला साथ दिली आहे. त्यामुळे कोणत्या गटाचे किती संख्याबळ याविषयी संभ्रम निर्माण आहे. कोण काय म्हणाले?काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व पतंगराव कदम यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून शेवंता वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडीतही नेहमीप्रमाणे बंडखोरी झाली आहे. सर्व नेतेमंडळी चर्चा करून बंडखोर उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास लावतील. आम्हीही तशी विनंती करू. या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल. - हारुण शिकलगार, महापौरकाँग्रेसच्या नेत्यांनी अधिकृत उमेदवाराबाबत कसलीही घोषणा केलेली नाही. त्याबाबत गटनेते किशोर जामदार यांनीही नगरसेवकांना कल्पना दिलेली नाही. त्यामुळेच ही बंडखोरी नाही. सुरेखा कांबळे यांचा काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे माघारीबाबत उमेदवारच निर्णय घेतील. काँग्रेसचे संख्याबळ असल्याने विजय निश्चित आहे. - शेखर माने, उपमहापौर गट