शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

रयत पॅनेलच्या पाठीशी ताकदीने उभे राहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST

इस्लामपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत विश्वजित कदम यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जितेश कदम, धनाजी बिरमुळे, बाळासाहेब पाटील उपस्थित ...

इस्लामपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत विश्वजित कदम यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जितेश कदम, धनाजी बिरमुळे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णाची निवडणूक साम, दाम, दंड व भेद नीतीचा अवलंब करून सर्व ताकदीनिशी लढविली जाणार आहे. रयत पॅनेलला जिथे अडचण येईल तिथे विश्वजित कदम कुठेही कमी पडणार नाहीत. ही निवडणूक मी माझ्या रणनीतीने लढविणार असल्याचे स्पष्ट मत सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.

इस्लामपूर (ता. वाळवा) येथे वाळवा तालुका काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीद्वारे कदम यांनी रयत पॅनेलच्या प्रचारात सक्रिय होत रणशिंग फुंकले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वाळवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील होते. या वेळी युवा नेते जितेश कदम व वाळवा तालुक्यातील यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

कदम म्हणाले, यशवंतराव मोहिते यांच्या मोठ्या श्रमातून कृष्णा कारखान्याची उभारणी झाली. कारखान्यामुळे या विभागात नंदनवन फुलले. भाऊंचे आशीर्वाद घेऊन अनेक जण मोठे झाले; पण त्यांच्या विचारांना केवळ पतंगराव कदम यांनीच जिवंत ठेवले. इंद्रजित मोहिते हे कुटुंबातील एक सदस्य आहेत. कदम कुटुंब सर्व ताकदीनिशी रयतच्या पाठीशी आहे. उमेदवारांनी मनात कोणताही किंतु न ठेवता ही निवडणूक लढवावी.

बाळासाहेब पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते रयत पॅनेलच्या पाठीशी ठाम उभे आहेत. तालुक्यातील सर्वसामान्य सभासद हा इंद्रजित मोहिते यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील. प्रा. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी जि.प. सदस्य धनाजी बिरमुळे, राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा छायाताई पाटील, दिलीपराव मोरे-पाटील, पै. गुलाबराव उर्फ जयकर पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.