शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बिऊरमध्ये रेशनिंगचा १२ लाखांचा तांदूळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिराळा तालुक्यातील बिऊर येथील राईस मिलवर छापा टाकून १२ लाख रुपये किमतीचा ४० टन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिराळा तालुक्यातील बिऊर येथील राईस मिलवर छापा टाकून १२ लाख रुपये किमतीचा ४० टन रेशनिंगचा तांदूळ जप्त करण्यात आला. सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी लक्ष्मी फाटा येथे सहा लाखांचा तांदूळ जप्त करण्यात आला होता. तीन दिवसांत १८ लाखांचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी संदीप वीरभद्र कानकात्रे आणि प्रवीण वीरभद्र कानकात्रे (दोघेही रा. नाझरे गल्ली, शिराळा) यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आली आहे.

बुधवार, दि. २ रोजी लक्ष्मी फाटा येथे सांगली ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ६ लाख रुपये किमतीचा २० टन तांदूळ जप्त केला होता. रमेश बाबू गुंडेवाडी (रा. सलगरे), प्रकाश केरबा पाडुळी आणि विजय दत्तात्रय शिंदे (दोघेही रा. हरिपूर) यांना अटक करण्यात आली होती. यावेळी हा तांदूळ शिराळा येथे घेऊन जात असल्याचे संशयितांनी सांगितले होते. त्यानुसार सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने बिऊर येथे ही कारवाई केली.

प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपनिरीक्षक सागर पाटील, संदीप मोरे, सचिन मोरे, शंतनू ढवळीकर, अविनाश कदम, महसूल विभागाचे दत्तात्रय बुरसे, चंद्रकांत मोहूटकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

चौकट

सिध्देश्वर राईस मिलच्या गोडावूनमधील ४० टन तांदूळ जप्त करत ते सील करण्यात आले आहे. या मिलमध्ये रेशनिंगचा तांदूळ कोठून येतो, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दाेन्ही कारवायांमध्ये १८ लाखांचा ६० टन तांदूळ जप्त करण्यात आला आहे.