शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

उसाचा दर ठरेना, गुळाला दर मिळेना!

By admin | Updated: December 10, 2014 23:44 IST

शेतकरी हवालदिल : आंदोलने शमल्याने गळीत हंगाम जोमात

पुनवत : प्रतिवर्षी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामादरम्यान अनेक शेतकरी संघटनांकडून ऊस दरासाठी केली जाणारी आंदोलने यंदा शमली आहेत. परिणामी यंदाच्या हंगामात उसदराची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. गळीत हंगामास जवळपास महिना उलटून गेला, तरी उसाचा दर ठरलेला नाही, तर दुसरीकडे वारणा पट्ट्यात चालू असलेल्या गुऱ्हाळघरातील गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कात्रीत सापडला असून, ना नफा, ना तोटा या तत्त्वावर अनेक शेतकऱ्यांनी उसावर कोयता चालवला आहे.सध्या जिल्ह्यात साखर कारखाने जोमात सुरू झाले आहेत, तर शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील गुऱ्हाळघरांमध्ये चिमण्याही पेटल्या आहेत. साखर आणि गुळाचे उत्पादन सुरू आहे. साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची हवा असायची. ऊसदरासाठी हे दोन्ही घटक रस्त्यावर उतरायचे, मात्र यंदा साखर कारखाने सुरू होऊन महिना उलटला, तरी उसाचा अधिकृत दर ठरलेला नाही. शेतकरी उसदराच्या प्रतीक्षेत असताना काँग्रेस सरकारच्या काळात भांडणाऱ्या शेतकरी संघटना यावर्षी कुठे गेल्या, असा सवालही शेतकरी करीत आहेत.दुसरीकडे वारणा पट्ट्यातील गुळाला प्रतिक्विंटल तीन हजाराच्या आसपासच दर मिळत असल्याने शेतकरी तोट्यात जात आहेत. शेतकऱ्याच्या एका आदणाला सुमारे अडीच क्विंटल गूळ पडला तर त्या गुळाचे ९ ते १० हजार रुपये होतात. त्यातून गुऱ्हाळभाडे २०००, वाहतूक, हमाली, तोलाई, दलाली, खते व मशागतीचा खर्च वजा केल्यास एका आदणाला ३००० रुपयेच मिळतात. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. (वार्ताहर)गुळाला अच्छे दिन येणार?एकीकडे ऊसदर अद्याप जाहीर झाला नसल्याने दुसरीकडे गुळालाही हा दर मिळेनासा झाला आहे. उसाचा दर निश्चित झाल्यानंतर गुळाला ‘अच्छे दिन’ यायला मदत होणार, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी सध्या शेत मोकळे करण्यासाठी कोयता चालवला आहे.