शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आरवडेत भाजपविरोधात राष्ट्रवादी--आबा-काका गटात संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:15 IST

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद खुले असल्याने चुरस निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे खुल्या सरपंचपदामुळे चुरस; राजकीय उलथापालथीने समीकरणे बदललीदोन्ही गटात आरक्षित जागेसाठी असणाºया उमेदवारांसाठी दबाव टाकला जात आहे

संजयकुमार चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कमांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद खुले असल्याने चुरस निर्माण झाली आहे. इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजअखेर गावातील दोन स्थानिक गटांत संघर्ष आहे. त्यांच्यात कधीच समझोता झालेला नाही. आताही मोठा संघर्ष पाहावयास मिळणार आहे.

आरवडेमध्ये चार प्रभाग असून, ३३०० मतदार आहेत व ११ सदस्य व १ सरपंच अशी १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या गावाची निवडणूक लक्षवेधी असते. हे संवेदनशील गाव आहे. गावात आर. आर. पाटील आबा विरुद्ध खासदार संजयकाका पाटील या दोन गटांचा टोकाचा संघर्ष आहे. परंतु मागील दोन वर्षात राजकारणात उलथापालथ झाली आहे. ग्रामपंचायतीवर गेली २० वर्षे खासदार गटाची सत्ता होती; परंतु या गटातील प्रमुख युवराज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी लोकसभेपूर्वी आर. आर. पाटील गटात प्रवेश केला. त्यामुळे खासदार गटाची ग्रामपंचायतीवरील सत्ता संपुष्टात आली.

एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या संभाजी मस्के, संदीप चव्हाण, संतोष पाटील, बालाजी पाटील, सुदाम पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी खासदार गटात प्रवेश केला. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साह संचारला आहे. खासदार पाटील यांनी हे गाव सांसद आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतल्याने विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे पाटील यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. त्यांनी यासाठी ताकद दिली आहे.

ग्रामपंचायतीतील विरोधी गटाचे नेतृत्व संभाजी मस्के, राजू साहेब, बाळासाहेब शिंदे, संतोष पाटील करत आहेत. त्यांनी यावेळी सत्ताधारी गटापुढे मोठे आव्हान उभे केले आहे व सत्ता उलथवून लावण्याचा निर्धार केला आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य युवराज पाटील व प्रकाश पाटील करत आहेत. सत्ताधारी गटातील बरीच नाराज मंडळी तसेच खासदार निष्ठावंतांनी विरोधी गटात प्रवेश केला असल्याने सत्ताधारी गटात अस्वस्थता आहे.दोन्ही गटात आरक्षित जागेसाठी असणाºया उमेदवारांसाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे उमेदवार देताना दोन्ही गटाची डोकेदुखी झाली आहे. प्रभागवार बैठका सुरू आहेत.निवडणुकीची चर्चा : जोरातविरोधक मागील २० वर्षांत ग्रामपंचायतीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन जनतेपुढे जात आहेत, तर सत्ताधारी केलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत आहेत. निवडणुकीची चर्चा परिसरात जोरात होत आहे.