शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगच्या हातचलाखीत अधिकारी वाटेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रेशनिंगच्या व्यवसायात हातचलाखी होत असली तरी, त्यात अधिकारी वाटेकरी होते. प्रामाणिक व्यवसाय चालविला तर कोणाचाही उदरनिर्वाह होणार नाही. त्यामुळे आम्हाला मानधन सुरू करावे, आम्ही प्रामाणिक व्यवसायास कटिबद्ध आहोत, असे परखड मत माजी खासदार गजानन बाबर यांनी बुधवारी रेशन दुकानदारांच्या मेळाव्यात व्यक्त केले.सांगलीच्या मार्केट यार्डातील वसंतदादा भवनात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रेशनिंगच्या व्यवसायात हातचलाखी होत असली तरी, त्यात अधिकारी वाटेकरी होते. प्रामाणिक व्यवसाय चालविला तर कोणाचाही उदरनिर्वाह होणार नाही. त्यामुळे आम्हाला मानधन सुरू करावे, आम्ही प्रामाणिक व्यवसायास कटिबद्ध आहोत, असे परखड मत माजी खासदार गजानन बाबर यांनी बुधवारी रेशन दुकानदारांच्या मेळाव्यात व्यक्त केले.सांगलीच्या मार्केट यार्डातील वसंतदादा भवनात आॅल महाराष्टÑ फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनतर्फे मेळावा पार पडला, यावेळी ते बोलत होते. बाबर म्हणाले की, रास्त भाव धान्य दुकानदारांसाठी तामिळनाडू व अन्य काही राज्यांप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करावे व प्रतिमाह दुकानदारांना ५0 हजार मानधन देण्यात यावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. येत्या १ सप्टेंबरपर्यंत महामंडळ स्थापन करून मानधन सुरू केले नाही, तर आधार नोेंदणीसाठी दुकानदारांना दिलेले पॉझ यंत्र आम्ही शासनाला परत करू. दुकानदारांच्या समस्या समजून घेण्यापेक्षा त्यांच्याकडे अप्रामाणिक म्हणून पाहिले जाते. शासनाची ही दृष्टी असली तरी, या गोष्टीस शासकीय अधिकारीच कारणीभूत आहेत.गेल्या काही वर्षांपासून रेशनिंग व्यावसायात हातचलाखीचा प्रकार सुरू असल्याची गोष्ट खरी आहे. सरकारी अधिकारीच वाटेकरी असल्याने हा प्रकार घडत आहे. प्रामाणिक व्यवसाय केला असता, तर दुकानदार जगूच शकले नसते. कारण या व्यवसायाची रचनाच तशी करण्यात आली होती. आम्हालाही हा अप्रामाणिकपणा संपवायचा आहे. मागणीप्रमाणे आम्हाला पन्नास हजार प्रतिमाह मानधन दिल्यास प्रामाणिक व्यवसायास आम्ही कटिबद्ध आहोत. रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्याचा इशारा हल्ली दिला जात आहे. वास्तविक एखादे दुकान तहसीलदारांना चालवायला द्यावे, म्हणजे त्यांना या व्यवसायातील व्यथा कळतील, असे ते म्हणाले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, वसंत अग्रवाल, बाळासाहेब कोरे, यशवंत भोरे, शशिकांत मोरे, प्रभाकर कोळपकर, संदीप ठोंबरे, आनंदराव पाटील, आप्पासाहेब पाटील, बाळासाहेब पवार, दीपक उपाध्ये, कुमार कोळी, पांडुरंग जमदाडे आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्यारास्त भाव धान्य दुकानदारांसाठी तामिळनाडू व अन्य काही राज्यांप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करावे व प्रतिमाह दुकानदारांना ५० हजार मानधन देण्यात यावे, अन्न सुरक्षा कायद्यानुसार द्वारपोच धान्य योजना चालू व्हावी, केशरी शिधापत्रिकाधारकांना मराठवाडा, विदर्भाप्रमाणे धान्य देण्यात यावे, दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकांची बंद झालेली साखर पुन्हा सुरू करावी, रॉकेल हॉकर्सना लिटरला दोन रुपये कमिशन मिळावे, त्यांना पाच किलो गॅसची एजन्सी देण्यात यावी, आधारकार्ड जमा करण्याच्या कामास प्रशासनाने डिसेंबरअखेर मुदतवाढ द्यावी, पॉझ यंत्राद्वारे धान्य वाटप करताना येणाºया तुटीबाबत शासनाने कायदा करावा, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.