शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

तासगावात शॉक देऊन युवतीवर बलात्कार

By admin | Updated: October 21, 2016 01:22 IST

तरुणास अटक : डान्स क्लासच्या बहाण्याने सहा वर्षांपूर्वी झाली होती भेट

तासगाव : डान्स क्लासच्या बहाण्याने ओळखीचा फायदा घेत तासगावातील तरुणाने इचलकरंजीतील तरुणीवर सातत्याने बलात्कार केल्याचा तसेच वेळोवेळी तिला विजेचे झटके देऊन मारहाण केल्याचा प्रकार तासगावमध्ये गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी मयूर दत्तात्रय पवार (रा. स्टेट बँकेजवळ, काशिपुरा गल्ली, तासगाव) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर मयूर पवार याचा भाऊ चैतन्य दत्तात्रय पवार याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पीडित युवती व मयूर पवार या दोघांची ओळख सहा वर्षांपूर्वी एका डान्स स्पर्धेत झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या डान्स स्पर्धेत त्यांची भेट होत राहिली. दीड वर्षापूर्वी मयूरने युवतीच्या घरी जात ‘आपण तासगावमध्ये डान्स क्लास काढू’, असे सांगून तासगावला येण्यास भाग पाडले. दर शनिवारी व रविवारी क्लास असल्याने संबंधित युवती क्लासमध्येच रहात होती. सहा महिन्यांपूर्वी मयूरने संबंधित युवतीला क्लासमध्ये एकटी पाहून जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. यानंतर त्याने वारंवार संशयावरून संबंधित युवतीला मारहाण केली. आठ दिवसांपूर्वी संबंधित युवतीचे लग्न ठरले. मात्र मयूरने ‘तुझ्या व्हिडीओ क्लिप्स पाहिजे असतील तर तू मला सांगलीत भेटायला ये’, अशी धमकी दिली. यानंतर युवती घाबरून त्याला सांगलीत भेटण्यास आली. मात्र मयूरने तिला जबरदस्ती तासगावला डान्स क्लासमध्ये आणून विजेचे झटके दिले. संबंधित प्रकारानंतर युवतीने स्वत:ची सुटका करून घेत तेथून पळ काढला. त्यानंतर घरच्यांसोबत तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर मयूर पवार यास अटक करण्यात आली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एम. एच. शेख करीत आहेत.