शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत तरुणीची अश्लील चित्रफीत काढून बलात्कार

By admin | Updated: January 22, 2017 23:33 IST

जिल्हा बँकेतील लिपिकास अटक : सात दिवसांची कोठडी

मिरज : मिरजेत तरुणीची अश्लील चित्रफीत काढून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या अमोल पुंडलिक जगताप (वय २५, रा. पंचायत समिती कर्मचारी वसाहत मिरज) या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिकास गांधी चौक पोलिसांनी अटक केली. अमोल जगताप यास न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी दिली आहे. अमोल जगताप याचे वडील जिल्हा परिषदेत नोकरी करीत असल्याने तो पंचायत समिती कर्मचारी वसाहतीत राहतो. २३ वर्षीय तरुणी अंघोळ करीत असताना, अमोल याने मोबाईलवर तिचे चित्रण केले होते. या चित्रणाच्या आधारे या तरुणीस ब्लॅकमेल करून अमोल याने तिच्यावर दोन वर्षे वारंवार बलात्कार केला. दरम्यान संबंधित तरुणीचे लग्न ठरल्यानंतरही त्याने तिला त्रास दिला. तरुणीचे लग्न झाल्यानंतरही अमोल याने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करून धमकावले. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित तरूणीने गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली. गांधी चौक पोलिसांनी अमोल जगताप याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. (वार्ताहर)आत्महत्येचा प्रयत्नपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलीने या त्रासाला कंटाळून ब्लेडने हाताच्या शिरा कापून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात आली. त्यांनी तिला धीर देऊन पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. संशयिताने वारंवार चित्रफीत सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. त्यास अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून, चित्रफीतही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.