कुपवाड : विवाहित महिलेच्या ओळखीचा फायदा घेऊन पाणी पिण्याचा बहाणा करीत तिच्या घरात जाऊन बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन गौतम माने (वय ३०, रा. बामणोली, ता. मिरज) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित सचिन माने याची पीडित महिलेच्या कुटुंबाशी ओळख आहे. ओळखीचा फायदा घेत शुक्रवारी ताे पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडित महिलेच्या घरी गेला. घरी काेणी नसल्याचे पाहून संबंधित महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर ‘कोणास काही सांगितलेस तर तुला जिवंत ठेवणार नाही.’ अशी धमकी देऊन ताे पसार झाला. पीडित महिलेने संशयिताविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित माने याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.