शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षपदी रणजित पाटील

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

जिल्हा परिषद : सावंत, पाटील, लोहार, यमगर यांची नावे आघाडीवर

सांगली : जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी कामेरी (ता. वाळवा) येथील रणजित पाटील यांची निवड निश्चित समजली जाते. उर्वरित चार सभापती पदांबाबत मात्र नेत्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच होते. समिती सभापती पदासाठी जत तालुक्यातून संजीवकुमार सावंत, सुनंदा पाटील, कवठेमहांकाळमधून तानाजी यमगर आणि शिराळा तालुक्यातून जगन्नाथ लोहार यांची नावे मुंबईतील बैठकीत आघाडीवर होती.मुंबईत मंगळवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, आ. सुमनताई पाटील, माजी आ. राजेंद्रआण्णा देशमुख, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्यासह भाजप-सेनेचे आमदार उपस्थित होते. उपाध्यक्षपदी रणजित पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. जत तालुक्याला दोन सभापतिपदे जाण्याची शक्यता आहे. एक पद राष्ट्रवादीला आणि दुसरे विलासराव जगताप समर्थकाला मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून सुनंदा पाटील, रूपाली पाटील, तर जगताप गटाकडून सुशिला होनमोरे, संजीवकुमार सावंत यांची नावे चर्चेत होती. सुनंदा पाटील, संजीवकुमार सावंत यांची नावे निश्चित झाल्याची चर्चा आहे. आटपाडी तालुक्यातून खरसुंडीच्या कुसूम मोटे यांचेही नाव चर्चेत आले होते. पण, शिराळा तालुक्यातील जगन्नाथ लोहार यांना संधी देण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे त्यांचेही नाव पुन्हा आघाडीवर आले आहे.कवठेमहांकाळ तालुक्यातून माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक तानाजी यमगर यांना संधी देण्यास कुणाचाही विरोध नाही. पण, दत्ताजीराव पाटील, भाऊसाहेब पाटील यांनी संधी देण्याची मागणी केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. तासगाव तालुक्यास जि. प. अध्यक्ष पदासह एक सभापतीपद देण्याची जोरदार मागणी आर. आर. पाटील (आबा) गटाकडून झाली. परंतु, नेत्यांनी सर्व तालुक्यांचा समतोल राखण्यासाठी आबा गटाला संयमाची भूमिका घेण्याची सूचना दिली. (प्रतिनिधी)आज निवडी : इच्छुकांची उत्सुकता शिगेलाजिल्हा परिषद उपाध्यक्ष व चार सभापतींच्या निवडी बुधवार, दि. १३ रोजी होणार आहेत. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांताधिकारी सुभाष बोरकर यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत अर्ज दाखल करणे, तर दुपारी १२ ते १२.१५ पर्यंत अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. दुपारी १२.१५ ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. पदाधिकारी निवडीत पाचपेक्षा जादा अर्ज राहिल्यास निवडणूक होणार आहे. तोपर्यंत इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.खानापूरची संधी हुकलीखानापूर तालुक्यातून अनिल बाबर गटाकडून फिरोज शेख, तर राजेंद्रअण्णा देशमुख गटाकडून किसन जानकर यांना संधी मिळण्याची शक्यता होती. पण, दोन्ही नेत्यांच्या भांडणात खानापूर तालुक्याची संधीच हुकली आहे.