शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बैठकीत रंगले नाराजीनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST

सांगली : जिल्हा परिषद सदस्य बदलाच्या बैठकीत खासदार संजय पाटील यांचा चढलेला पारा सदस्यांत चर्चेचा विषय ठरला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ...

सांगली : जिल्हा परिषद सदस्य बदलाच्या बैठकीत खासदार संजय पाटील यांचा चढलेला पारा सदस्यांत चर्चेचा विषय ठरला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी ते आले, पण अवघ्या दोन-तीन मिनिटांतच तडकाफडकी बाहेर पडले.

चंद्रकांत पाटील रविवारी दिवसभर विविध बैठका व कार्यक्रमांसाठी सांगलीत होते, पण खासदार पाटील त्यांच्या एकाही कार्यक्रमात दिसले नाहीत. सकाळी विजयनगरला एका हॉटेलमध्ये पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक होती. त्यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते, मात्र खासदारांची अनुपस्थिती होती. ही बैठक संपतेवेळी ते आले. त्यावेळी चंद्रकांत पाटील जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या बैठकीसाठी अध्यक्षांच्या बंगल्यावर गेले. तेथे एका कक्षात चंद्रकांत पाटील बसले होते. खासदार पाटील त्यांना भेटून चर्चेसाठी आत गेले, पण अवघ्या दोन-तीन मिनिटांतच बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काही तरी बिनसल्याचे सांगत होते.

बंगल्याबाहेर भाजपचे सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्यापैकी काहींनी खासदार पाटील यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत ते गाडीत जाऊन बसले होते. गाडीत बसताना झालेला दरवाजाचा मोठा आवाजही बरेच काही सांगणारा होता. खासदार निघाल्याचे पाहून बंगल्यातून एक व्यक्ती पळत गाडीकडे आला, दादा बोलवत असल्याचे त्याने सांगितले, पण खासदार थांबले नाहीत. खासदारांची ही गरमागरमीची भेट बरेच काही सांगणारी होती.

चौकट

जिल्हा परिषद बदलाची ठिणगी ?

काही सदस्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेतील बदलासाठी खासदार आग्रही होते. बदलाचा निर्णय आजच झाला पाहिजे. माझ्यासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी, अशी त्यांची मागणी होती, पण प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बदलाचा निर्णय लोंबकळत ठेवल्याचा राग खासदारांना आला. पहिल्यांदा महापालिकेचे पाहू, नंतर जिल्हा परिषदेची चर्चा करू, असा चंद्रकांत पाटील यांचा सूर होता, तो मान्य नसल्याने खासदार संतापले असावेत, अशी शक्यता सदस्यांनी व्यक्त केली.

------