शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रामापूरचा वायरमन आंधळीमध्ये जाळ्यात

By admin | Updated: March 20, 2016 00:16 IST

पलूस रडारवर

सांगली/पलूस : तोडलेला घरगुती वीजपुरवठा पुन्हा जोडण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या पलूस कार्यालयातील वायरमनला रंगेहात पकडण्यात आले. शंकर राजाराम शिंदे (वय ५८, रा. रामापूर, ता. कडेगाव) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाागचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांच्या पथकाने आंधळी (ता. पलूस) येथे शनिवारी दुपारी पावणेएक वाजता ही कारवाई केली. तक्रारदार आंधळी परिसरातील आहेत. त्यांच्या घरातील वीजपुरवठा थकबाकीपोटी तोडण्यात आला होता. तक्रारदाराने काही दिवसापूर्वी थकबाकी भरली. पुन्हा वीज पुरवठा सुरु करावा, यासाठी ते महावितरणच्या पलूस कार्यालयात गेले होते. आंधळी परिसर वायरमन शंकर शिंदे याच्या हद्दीत येतो. त्यामुळे हे काम त्याच्यावर सोपविले होते. यासाठी शिंदे याने तक्रारदाराकडे दोन हजाराची लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम दिली तरच वीज पुरवठा सुरु करणार, असे त्याने सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागाने तक्रारीची चौकशी केली. यामध्ये शिंदेने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. शिंदे शनिवारी दुपारी लाचेची रक्कम स्वीकारण्यास आंधळीला गेला होता. तत्पूर्वी लाचलुचपतच्या पथकाने तिथे सापळा लावला होता. दुपारी पावणेएक वाजता लाचेची रक्कम स्वीकारताना त्यास रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास उद्या (रविवारी) न्यायालयात उभे केले जाणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पलूसमध्ये लाचखोरांना पकडण्याच्या कारवाईत वाढ झाल्याचे दिसून येते. दोन महिन्यापूर्वी पलूस पोलीस ठाण्यातील तीन लाचखोर पोलीस जेरबंद झाले. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयातील दोन लिपिक सापडले. शनिवारी वायरमन शिंदेही जाळ्यात सापडला.