शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरा केळकर यांना राम कदम पुरस्कार--मिरजेत समारंभ :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 21:23 IST

मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात शुक्रवारी संगीतकार राम कदम पुरस्कार पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्याहस्ते देण्यात आला.

ठळक मुद्देअंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव ‘स्वरताल’ हा संगीतकार राम कदम यांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम

मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात शुक्रवारी संगीतकार राम कदम पुरस्कार पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्याहस्ते देण्यात आला. संगीत सभेत शास्त्रीय गायन व राम कदम यांच्या मराठी चित्रपट गीतांना श्रोत्यांनी दाद दिली.चिन्मयी आठले (कोल्हापूर) यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग भीमपलास आळविला. विलंबित एक तालात रे विरहा, द्रुत त्रितालात पिया पास ले जाये, तराणा नाम मुखी घ्या हे भजन, घटघट मे पंछी बोलना हे निर्गुणी भजन त्यांनी सादर केले. हरिप्रिया पाटील यांनी हार्मोनियम साथ, विरेश संकाजे यांनी तानपुरासाथ व प्रदीप कुलकर्णी यांनी तबलासाथ केली. चिन्मयी आठले यांच्या बहारदार गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.संगीतकार राम कदम पुरस्कार पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना देण्यात आला. याप्रसंगी विजय राम कदम, मेधा चांदवडकर, सुगंधा तिरोडकर, नवरात्र संगीत महोत्सवाचे अध्यक्ष मधू पाटील यांच्यासह मोठ्यासंख्येने श्रोते उपस्थित होते. यावेळी ‘स्वरताल’ हा संगीतकार राम कदम यांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला.विजय कदम व उत्तरा केळकर यांनी राम कदम यांनी संगीतबध्द केलेली मराठी चित्रपट गीते सादर केली. संगीत महोत्सवात शनिवारी ‘विख्यात तबलावादक डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार’ महिला तबला वादक धनश्री नागेशकर यांना देण्यात येणार आहे.संगीत महोत्सवात दि. २८ पर्यंत अमेरिकन कलाकार न्यॅश न्युबर्ट यांच्या बासरीवादनासह दिग्गज कलाकार मंडळी गायन-वादन व नृत्य सादर करणार आहेत. विनायक गुरव, संभाजी भोसले, डॉ. शेखर करमरकर, बाळासाहेब मिरजकर यांनी संयोजन केले.