शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

पोलिसांच्या दडपशाहीला आव्हान देत राजू शेट्टी उतरले मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST

इस्लामपूर : एकरकमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील बापूंच्या पुतळ्याला अभिषेक घालण्याचे ...

इस्लामपूर : एकरकमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील बापूंच्या पुतळ्याला अभिषेक घालण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोमवारी होणारे आंदोलन पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर, माजी खा. राजू शेट्टी यांनी स्वत: मैदानात उडी घेतली. बापूंच्या पुतळ्यासमोर ३०-४० कार्यकर्त्यांसोबत ठाण मांडत पोलिसांच्या दडपशाहीला प्रत्युत्तर दिले. सोमवारी पहाटेपासूनच जिल्हाभरात एकाचवेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली होती.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजारामबापू पाटील यांच्या पुतळा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संजय बेले, वाळवा तालुका अध्यक्ष भगवत जाधव, प्रभाकर पाटील, रमेश पाटील, तानाजी साठे, संतोष शेळके, जगन्नाथ भोसले या पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांना इस्लामपूर, कासेगाव, पलूस आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवले होते. त्यामुळे बापूंच्या पुतळ्यासमोरील आंदोलन दडपल्याची भावना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.

पोलिसांच्या या दडपशाहीची माहिती मिळताच स्वाभिमानीचे संस्थापक माजी खा. राजू शेट्टी यांनी दुपारी एकच्या सुमारास कार्यकर्त्यांसोबत थेट राजारामबापू कारखान्यावरील पुतळा परिसरात ठाण मांडले. यावेळी त्यांनी, हे आंदोलन शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने होणार होते. त्यामुळे पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना डांबून ठेवले? कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे हे षड्‌यंत्र आहे. त्यामुळे मला या ठिकाणी यावे लागले. यापुढे पोलिसांची ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.

यावेळी अ‍ॅड. एस. यू. संदे, अप्पासाहेब पाटील, संदीप राजोबा, दिग्विजय पाटील, धन्यकुमार पाटील, बापूसाहेब मोरे, राजाभाऊ दुकाने, रामभाऊ पाटील, विक्रांत कबुरे, बाबा चांदरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.