शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष पदासाठी राजू म्हेत्रेंचे पारडे जड

By admin | Updated: September 9, 2016 01:14 IST

तासगाव नगरपालिका : खासदारांकडून शिक्कामोर्तब; अनिल कुत्तेंना दे धक्का; राष्ट्रवादीचाही अर्ज

तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी भाजपकडून नगरसेवक राजू म्हेत्रे यांचे पारडे जड ठरले. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी खासदार संजयकाका पाटील यांनी म्हेत्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. भाजपच्या गोटात ही निवड अनपेक्षित मानली जात असून, नगरसेवक अनिल कुत्ते यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीकडूनही यावेळी नगरसेवक सुरेश थोरात यांचा अर्ज दाखल झाला आहे.तासगाव नगरपालिकेतील विद्यमान कारभाऱ्यांची ही अखेरची टर्म आहे. तत्कालीन नगराध्यक्ष अविनाश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर, नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळात पडणार, याची उत्सुकता होती. गुरुवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची मुदत होती. नगरसेवक अनिल कुत्ते यांचे नाव अंतिम असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. मात्र गुरुवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर खासदार संजयकाका पाटील यांनी नगरसेवक अविनाश पाटील, बाबासाहेब पाटील, राजू म्हेत्रे आणि अनिल कुत्ते यांच्यासोबत बैठक घेतली. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी राजू म्हेत्रे यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर म्हेत्रे यांनी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी नगरसेवक अविनाश पाटील, बाबासाहेब पाटील, अनिल कुत्ते, जाफर मुजावर, बाळासाहेब जामदार, दिनकर धाबुगडे, बापू धोत्रे उपस्थित होते.दरम्यान, भाजपअंतर्गत कुरघोड्यांची कुणकुण लागल्यामुळे भाजपांतर्गत नाराजीचा फायदा उठविण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही अर्ज दाखल करण्यात आला. नगरसेवक सुरेश थोरात यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाचीही उलटसुलट चर्चा होत होती. १६ तारखेला अर्ज माघारीची मुदत आहे. त्यावेळी थोरात यांचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता असून १७ तारखेला नगराध्यक्ष निवड होणार आहे. (वार्ताहर)कुत्ते समर्थकांची नाराजी नगरसेवक अनिल कुत्ते यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी अंतिम मानले जात होते. त्यामुळे गुरुवारी त्यांचाच अर्ज दाखल होणार, याची खात्री कुत्ते समर्थकांसह अनेक भाजपच्या नगरसेवकांनादेखील होती. मात्र ऐनवेळी खासदारांनी राजू म्हेत्रे यांचे नाव जाहीर केल्यामुळे अनिल कुत्तेसमर्थक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.