शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

‘राजारामबापू’ची साखर रोखली

By admin | Updated: January 2, 2015 00:11 IST

शेतकरी संघटना : पहिली उचल साडेतीन हजार रुपये न दिल्याने आंदोलन

इस्लामपूर : उसाला साडेतीन हजार रुपयांची पहिली उचल न दिल्यामुळे आज (गुरुवारी) शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू कारखान्यातून साखर भरून बाहेर पडणारे पाच कंटेनर रोखून धरले. दीड तास कार्यकर्त्यांनी तेथे तळ ठोकला होता. कंटेनर चालक व आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील, इकबाल जमादार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. रघुनाथदादा पाटील यांनी आठ दिवसांपूर्वीच, कारखान्यांनी साडेतीन हजार रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय न घेतल्यास १ जानेवारीपासून साखर, पेट्रोल व डिझेल वाहतूक, विक्री रोखून धरण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज दुपारी ‘राजारामबापू’च्या परिसरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धडक मारून हे आंदोलन केले. दीड तास साखरेचे कंटेनर कार्यकर्त्यांनी रोखून धरले होते. त्यानंतर कारखाना परिसरातील डिझेल व पेट्रोल पंपावर जाऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तेथील विक्री व्यवहारही बंद पाडला. उसाला साडेतीन हजारांची उचल दिली नाही, तर आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील म्हणाले की, जोपर्यंत शासन साखर विक्रीचा दर ४० रुपये प्रतिकिलो असा करत नाही, तसेच इथेनॉलला ६० रुपये प्रतिलिटर दर देऊन त्याचा पेट्रोलमध्ये वापर करण्यास परवानगी देत नाही, तोपर्यंत साखर कारखानदारांनी साखर विक्री करू नये. वरील दोन्ही बाबींना शासनाने मान्यता दिली, तर उसाला साडेतीन हजार रुपयांची पहिली उचल देणे शक्य आहे. याचा शासन आणि कारखानदारांनी गांभीर्याने विचार करावा. हा निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकरी संघटनेच्यावतीने हे आंदोलन सुरुच राहील. यापुढच्या टप्प्यात साखरेचे कंटेनर व पेट्रोल, डिझेलचे कंटेनर पेटवून देऊ. शंकरराव मोहिते, एकनाथ निकम, सुभाष पाटील, आर. एस. पाटील, महादेव पवार, विश्वास मोकाशी, धनपाल माळी यांनी आंदोलनात सहभाग घेतला. (वार्ताहर)चालक व आंदोलकांत शाब्दिक चकमकराजारामबापू कारखान्यातून साखर भरून बाहेर पडणारे पाच कंटेनर रोखून धरले. सुमारे दीड तास कार्यकर्त्यांनी तेथे तळ ठोकला होता. कंटेनर चालक व आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. पेट्रोल व डिझेल पंपावरील विक्रीही काही काळ बंद पाडली.आंदोलकांनी पाच कंटेनर रोखून धरले