शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राजारामबापू कारखान्याच्या कर्जप्रकरणावरून खडाजंगी

By admin | Updated: July 7, 2015 01:21 IST

जिल्हा बॅँक बैठक : बॅँकेला राजकीय अड्डा बनविल्याचा विशाल पाटील यांचा आरोप

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याला ४० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी जिल्हा बॅँकेच्या सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. कॉँग्रेसचे सदस्य विशाल पाटील यांनी राजारामबापू कारखान्याला नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा आरोप यावेळी केला. दुसरीकडे बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावताना, कोणतीही नियमबाह्य प्रक्रिया राबविली नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी दुपारी पार पडली. साडेतीन तास ही सभा सुरू होती. राजारामबापू कारखान्याच्या चार युनिटला बॅँकेने चाळीस कोटी रुपयांचे कर्ज दिल्याने या बैठकीत विशाल पाटील यांनी सत्ताधारी गटावर हल्लाबोल केला. बॅँकेचा वापर स्वत:च्या संस्था टिकविण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजारामबापू बॅँक शॉर्ट मार्जिनमध्ये (अपुरा दुरावा) असतानाही कर्जवाटप कसे केले?, एकच संस्था असतानाही चार वेगवेगळे कारखाने दाखवून मर्यादेपेक्षा जास्त कर्जपुरवठा कोणत्या कायद्याच्या आधारे मंजूर केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिलीपतात्या पाटील यांनी कारखान्याची स्वतंत्र चार मर्यादेपेक्षा जादा कर्ज विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एखाद्या संस्थेला कर्जपुरवठा करताना १२७ कोटीची मर्यादा असताना, राजारामबापू कारखान्यास २९२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. अपुरा दुरावा असतानाही कारखान्याच्या चारही युनिटना प्रत्येकी १0 कोटी रुपयांप्रमाणे ४0 कोटी रुपये तात्पुरते कर्ज देण्यात आले आहे. बँकेच्या माध्यमातून स्वत:च्या संस्थांचा फायदा केला जात आहे. चार वेगवेगळी युनिट असली तरी, राजारामबापू सहकारी साखर कारखाना ही एकच संस्था आहे. त्यामुळे त्यांच्याकडे स्वतंत्र युनिट म्हणून पाहताच येत नाही. तरीही नियमबाह्य कर्जपुरवठा करण्यात आला आहे. समित्यांवरूनही नाराजी कार्यकारी समिती, लेखापरीक्षण समिती नियुक्त करण्यावरूनही काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. समिती सदस्यत्वासाठी नेमके काय निकष लावण्यात आले, असा सवाल प्रताप पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर या समित्यांमध्ये चार महिन्यांनी बदल होत असतो. त्यामुळे पुढील काळात प्रत्येकालाच संधी मिळू शकते, असे स्पष्टीकरण दिलीपतात्या पाटील यांनी दिले.