शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरी हळदीला उच्चांकी २४१०० रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:33 IST

सांगली : अतिवृष्टी आणि महापुरामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणात हळदीचे उत्पादन घटले आहे. त्यातच काेरोनामुळे मागणीही वाढली आहे. ...

सांगली : अतिवृष्टी आणि महापुरामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणात हळदीचे उत्पादन घटले आहे. त्यातच काेरोनामुळे मागणीही वाढली आहे. सांगली बाजार समितीच्या बुधवारच्या सौद्यात क्विंटलला २४ हजार १०० रुपये दर मिळाला. २०१२ मध्ये सर्वाधिक २१ हजार रुपये दर मिळाला होता, त्यानंतर प्रथमच अर्धा तोळा सोन्याचा भाव राजापुरी हळदीला मिळाला आहे.सलग आठ दिवस राजापुरी हळदीच्या दरात वाढ दिसत आहे.

सांगलीची हळद आणि बेदाण्याची बाजारपेठ देशात प्रसिध्द आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून दर वाढत आहे. दि. १६ फेब्रुवारीच्या सौद्यात १७ हजार १०० रुपये, तर मंगळवारच्या सौद्यात २१ हजार रुपये दर मिळाला. त्यानंतर बुधवारी संगमेश्‍वर ट्रेडर्समधील सौद्यात रामाप्पा नेमगोंडर (रा. गुरलापूर, जि. बेळगाव) यांच्या राजापुरी हळदीला २४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल इतका आतापर्यंतचा उच्चांकी दर मिळाला. ही हळद यु. के. खिमजी यांनी खरेदी केली. हा आतापर्यंतचा विक्रमी दर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सौद्यासाठी अडते, व्यापारी, खरेदीदार, शेतकरी, हमाल, तोलाईदार, हळद सौदे विभागप्रमुख मोहनसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

चौकट

हळदीला विक्रमी दर

सांगली बाजार समितीमध्ये २०१२ मध्ये २१ हजाराचा दर मिळाला होता. परंतु, बुधवारी प्रथमच २४ हजार १०० रुपये दर मिळाला आहे. असा दर मिळाला तरच शेतकऱ्यांना हळदीची शेती परवडेल, असे मत सभापती दिनकर पाटील व सचिव एम. पी. चव्हाण यांनी व्यक्त केले.