शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर बंधाऱ्यामधून कर्नाटकास पाणी सोडणार

By admin | Updated: April 22, 2016 00:50 IST

पाण्याच्या बदल्यात पाणी : कर्नाटकातून अक्कलकोटला पाणी मिळणार

सांगली : कमी पर्जन्यमानामुळे महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटकातही तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी गुरुवारी सांगलीत महाराष्ट्र व कर्नाटक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकात एक टीएमसी पाणी सोडण्याचा, तर कर्नाटकातील नारायणपूर योजनेतून अक्कलकोटला एक टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. कर्नाटकातील तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन वारणा (चांदोली) व कोयना धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या पाण्याचे नियोजन करण्यासाठी दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यापासून कर्नाटकातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे कर्नाटकातील अनेक भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक सरकारने कृष्णा नदीतून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, धरणात असलेल्या कमी पाणीसाठ्यामुळे एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कर्नाटकातील हिरेपडसलगी योजनेतून जत तालुक्यातील गावांना पाणी सोडण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, नदीपात्रात पाणी नसल्याने व योजना कार्यान्वित नसल्याने जतला पाणी पुरविण्याचा निर्णय होऊ शकला नाही. मात्र, कर्नाटकातील नारायणपूर योजनेतून (इंडी कालवा) अक्कलकोटसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता टी. एम. मुंडे, बेळगावचे मुख्य अभियंता कुलकुंद, नारायणपूर योजनेचे मुख्य अभियंता छत्रपाल, सांगलीचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, सातारचे अधीक्षक अभियंता आर. डी. मोहिते, कोयना धरणाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जतला पाणीपुरवठा नाहीचदोन्ही राज्यांतील या पाण्याच्या देवाण-घेवाणीतून जत पूर्वभागाला हिरेपडसलगी योजनेतून पाणी मिळण्याची शक्यता होती. मात्र, गुरुवारी झालेल्या बैठकीत नारायणपूर योजनेतून अक्कलकोटला पाणी पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कर्नाटकात कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने जतला पाणीपुरवठा होऊ शकत नसल्याचे कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हिरेपडसलगीतून जत तालुक्याला पाणी मिळण्याची आशा मावळली आहे.