शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण उठवा, अन्यथा धडा शिकवू

By admin | Updated: December 15, 2015 23:27 IST

महापालिकेवर मोर्चा : गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीचा इशारा

सांगली : महापालिकेच्या विकास आराखड्यात रहिवासी क्षेत्रावर आरक्षण टाकताना सत्ताधारी झोपले होते का, असा सवाल करीत, आरक्षित जागेवरील आरक्षणे तातडीने उठवा, अन्यथा सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी मोर्चाद्वारे देण्यात आला. गुंठेवारी भागातील आरक्षणाविरोधात संघर्ष समितीच्यावतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व चंदन चव्हाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, शहराध्यक्ष अमर पडळकर, माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केले. यावेळी चंदन चव्हाण म्हणाले की, गेली २५ वर्षे गुंठेवारीतील नागरिकांना भूलथापा मारल्या जात आहेत. विकास आराखडा तयार करताना गुंठेवारीतील रहिवासी क्षेत्रावर आरक्षणे टाकण्यात आली. ही आरक्षणे उठविण्याचा ठराव महापालिकेने करावा, अन्यथा गुंठेवारीतील नागरिक नगरसेवकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. तानाजी सावंत म्हणाले की, वाचाळवीर महापौरांनी गुंठेवारीतील नागरिकांविरोधात बेताल व्यक्तव्ये बंद करावीत. त्यांनीच अतिक्रमण केले आहे. ते पाडण्याचे धाडस महापालिकेने दाखवावे. आम्ही घाबरण्यासाठी नव्हे, तर महापौरांना घाबरविण्यासाठी आलो आहोत. गुंठेवारीतील एकाही घराला हात लावू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पृथ्वीराज पवार म्हणाले की, विकास आराखडा तयार करताना राहत्या घरांवर आरक्षणे टाकल्याचे दिसले नाही का? काहीजण आराखड्याची भीती घालून नागरिकांना फसविण्याचा उद्योग करीत आहेत. अमर पडळकर म्हणाले की, गुंठेवारीतील घरांवर हातोडा मारण्यापेक्षा गुंठेवारीचे पैसे अडकलेल्या वसंतदादा बँकेवर हातोडा टाकावा. गुंठेवारीतील आरक्षणे उठत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, संदीप टेंगले, आशिष कोरी, अजिंक्य पाटील, शहाजी भोसले, सुरेश टेंगले, अजय माने, अजित दुधाळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)