शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

मार्चपासून पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:27 IST

गतवर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून मिरजेतून धावणाऱ्या सुमारे ६५ पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वे बंद करण्यात आल्या. सप्टेंबरपासून टप्प्या-टप्प्याने ...

गतवर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून मिरजेतून धावणाऱ्या सुमारे ६५ पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वे बंद करण्यात आल्या. सप्टेंबरपासून टप्प्या-टप्प्याने पुन्हा एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. या विशेष एक्स्प्रेसमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र, लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून गेले दहा महिने मिरजेतून जाणाऱ्या कोल्हापूर, बेळगाव, सातारा, पुणे, पंढरपूर, कुर्डूवाडी पॅसेंजर अद्याप बंद असल्याने दरारोज ये-जा करणाऱ्या नोकरदार व व्यावसायिक व विद्यार्थांची गैरसोय होत आहे. अनलाॅक काळात कोयना, महालक्ष्मी, महाराष्ट्र, हुबळी-कुर्ला, राणी चन्नम्मा, तिरुपती, यशवंतपूर-निजामुद्दीन, वास्को-निजामुद्दीन यासह इतर एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर-निजामुद्दीन व कोल्हापूर-अहमदाबाद या साप्ताहिक एक्स्प्रेसही सुरू होणार आहेत. मात्र मिरज-पंढरपूर मार्गावरील रेल्वे गाड्यांसह पॅसेंजर रेल्वे सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. मार्चपासून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची रेल्वे प्रशासनाची तयारी सुरू आहे. लाॅकडाऊन काळात रेल्वेगाड्या बंद असल्याने सांगली-मिरजेसह विविध स्थानकात थांबून असलेल्या रेल्वेगाड्या रवान‍ा झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यास पुढील महिन्यात पॅसेंजर रेल्वे सुरू होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्यास सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.

चाैकट

नातेवाईकांची गर्दी नकाे..

रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या नातेवाईकांनी गर्दी करू नये. यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट गेल्या मार्चपासून दहा रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहे. सर्व प्रमुख रेल्वे स्थानकासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे पाचपट दर यापुढेही कायम राहणार आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्म तिकिटाशिवाय रेल्वेस्थानकात येणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून नातेवाईकांसोबत गरज असलेल्यांनाच प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे.