शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे वाहतूक सुरक्षिततेची परीक्षा ?

By admin | Updated: July 6, 2016 00:38 IST

मुसळधार पाऊस : दरडींच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नजर

प्रकाश वराडकर-- रत्नागिरी -कोकण रेल्वेने गेल्या काही वर्षांतील मार्गावरील धोके ओळखून पावसाळापूर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसातही काही अपवादवगळता कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत सुरू आहे. मात्र, असाच पाऊस सुरू राहिला किंवा अचानकपणे काही दिवस पाऊस गायब झाला तर मात्र कोकण रेल्वेच्या मार्ग सुरक्षिततेची परीक्षा ठरू शकेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असत. त्यामुळे अनेकदा काही दिवसांसाठी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशाांचे प्रचंड हाल झाले होते. दरडी कोसळल्याने रेल्वेला अपघातही झाले होते. या संकटांतून बाहेर पडण्याचा अनुभव घेणाऱ्या कोकण रेल्वेने त्यानंतरच्या काळात मार्गावर दरड कोसळणे, पाणी साचणे यांसारख्या समस्यांवर चांगल्या उपाययोजना केल्या आहेत. मार्गावर अनेक ठिकाणी असलेली डोंगरांची उभी कटिंग्ज धोकादायक ठरल्याचे लक्षात आल्यानंतर ही कटिंग्ज आणखी कमी करण्यात आली व मार्ग सुरक्षित करण्यात आला. विशेषत: पोमेंडीतील डोंगराने कोकण रेल्वेला सर्वाधिक त्रास दिला. पावसाळ्यात दरड मार्गावर कोसळण्याचे प्रकार याठिकाणी अनेकदा झाले. त्यासाठी केलेली कॉँक्रीट भिंतीची उपाययोजनाही असफल ठरली. त्या भिंतीसह दरड मार्गावर कोसळली होती. पावसाळ्यातील या संकटांमुळे कोकण रेल्वेचे अभियंतेही हतबल झाले होते. मात्र, गेल्या दोन तीन वर्षात यामध्ये मोठ्या सुधारणा झाल्या असून, ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे, तेथे डोंगर मागे हटवण्यात आले आहेत. यंदा २० जूननंतरच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. गेल्या पंधरा दिवसात रत्नागिरी विभागात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे कोकण रेल्वेला अतिवृष्टीचा फटका बसू शकतो. तसेच अचानकपणे काही दिवसांसाठी पाऊस गायब झाला व नंतर सुरू झाला तर पाऊस नसलेल्या काळात मार्गालगतच्या पाण्याने फुगलेल्या डोंगरांना भेगा पडतील व त्यानंतर पडणाऱ्या पावसात दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पुढील काही दिवसात मार्गावरील सुरक्षिततेबाबत कोकण रेल्वेची खऱ्या अर्थाने परीक्षाच होणार असल्याचे बोलले जात आहे. एकूणच कोकण रेल्वेला पावसाळ्याचे तिन्ही महिने मोठी सत्वपरीक्षा द्यावी लागणार आहे.दुर्घटना : मार्गालगतच्या मोठ्या वृक्षांबाबतही हवी सावधानताकोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. दुपदरीकरणासाठी डोंगर, बोगद्यांमध्ये कटाई नव्याने करावी लागणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची दरडींची भीती यावर्षी कमी झाली असली तरी भविष्यात दुपदरीकरणानंतर नव्याने ही समस्या निर्माण होणार आहे. कोकणातील माती भुसभुशीत असल्याने मोठा पाऊस पडल्यास ती निसटते आणि रेल्वे रुळावर येते. ही समस्या थोडीफार कमी झाली आहे. मात्र, संपलेली नाही.कोकण रेल्वेमार्गावर वीर ते करंजाडी दरम्यान चालत्या गाडीवर झाड कोसळून दोन दिवसांपूर्वीच दुर्घटना झाली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे दरडी कोसळणे, दगड मार्गावर येणे, याबरोबरच आता मार्गालगत असलेल्या धोकादायक वृक्षांबाबतही निर्णय घेण्याची वेळ कोकण रेल्वेच्या प्रशासनावर आली आहे.