शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बेकायदा लॉटरी सेंटरवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आॅनलाईन लॉटरीच्या नावाखाली स्टेशन रस्त्यावरील गणेश मार्केट व माधवनगर (ता. मिरज) येथे सुरु असलेल्या विनापरवाना जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री छापे टाकून एक लाखाची रोकड व यंत्रसामग्री असा पावणेदोन लाखाचा माल जप्त केला. या छाप्यात मालकांसह १३ जणांना अटक केली आहे.गणेश मार्केटमधील कारवाईत नजीर अन्वर सय्यद (वय ...

ठळक मुद्देमाधवनगरमध्येही कारवाई : यंत्रसामग्री जप्त; मालकांसह १३ जणांना अटकयाप्रकरणी रात्री उशिरा शहर व संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल छाप्याची चाहूल लागताच मालक व ग्राहकांनी पळून जाण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आॅनलाईन लॉटरीच्या नावाखाली स्टेशन रस्त्यावरील गणेश मार्केट व माधवनगर (ता. मिरज) येथे सुरु असलेल्या विनापरवाना जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री छापे टाकून एक लाखाची रोकड व यंत्रसामग्री असा पावणेदोन लाखाचा माल जप्त केला. या छाप्यात मालकांसह १३ जणांना अटक केली आहे.

गणेश मार्केटमधील कारवाईत नजीर अन्वर सय्यद (वय ३२), नजीर जमीर सय्यद (३०, दोघे रा. स्टेशन रस्ता, मिरज), सचिन मनोहर घन्ह्यारी (२५, चैतन्यनगर, सांगली), महादेव नामदेव अवताडे (३२, कर्नाळ, ता. मिरज), गणेश नामदेव जाधव (२२, वाल्मिकी आवास, जुना बुधगाव, रस्ता, सांगली), सुनील बाळासाहेब कर्नाळे (२५, खणभाग), सूरज विलास पवार (२२, शंभरफुटी रस्ता), नसरुद्दीन रियाज मकानदार (३२), अजीम दिलावर मुलाणी (२६, दोघे रा. खणभाग), सागर सिद्धू मुळीक (२७, टिंबर एरिया, सांगली) व दीपक बाळासाहेब कागले (३६, हरिपूर, ता. मिरज) यांना अटक केली आहे. माधवनगरमध्ये रामदास मनोहर पाटील (३९, रविवार पेठ, माधवनगर) व विनायक सुभाष भिसे (२०, अहिल्यानगर, कुपवाड) यांना अटक केली आहे.

आॅनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना मिळाली होती. नांगरे-पाटील गुरुवारी रात्री सांगली दौºयावर होते. त्यांच्या पथकाने सांगली शहर व संजयनगर पोलिसांची मदत घेऊन एकाचवेळी गणेश मार्केटमधील गाळा क्रमांक २, ३, ८, ९, १६ व ७९ या ठिकाणी छापे टाकले. छाप्याची चाहूल लागताच मालक व ग्राहकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले.

छाप्यात १२ संगणक, १२ किबोर्ड, १२ माऊस, पाच प्रिंटर, ११ सीपीयू व ७५ हजाराची रोकड असा एक लाख २१ हजाराचा माल जप्त केला.तसेच माधवनगरलाही राणाप्रताप चौकात भूमी आॅनलाईन लॉटरीवर छापा टाकून संगणक, सीपीयू, मॉनिटर क्लिप यंत्र व ३४ हजाराची रोकड असा ४४ हजाराचा माल जप्त केला. याप्रकरणी रात्री उशिरा शहर व संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.