शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, माधवनगरला पेट्रोल पंपांवर छापे

By admin | Updated: July 17, 2017 00:10 IST

सांगली, माधवनगरला पेट्रोल पंपांवर छापे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मापात माप करणाऱ्या संशयित पेट्रोल पंपांवर छापे टाकण्याची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची सांगली जिल्ह्यातील कारवाई अद्याप सुरूच आहे. पथकाने रविवारी दुपारी माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याचा पेट्रोलपंप व माधवनगर जकात नाक्याजवळील सदाशिव पेट्रोलियम या दोन पंपांवर छापे टाकून तीन तास तपासणी केली. पण तिथे आक्षेपार्ह काहीच आढळून आले नाही. जिल्ह्यातील आणखी तीन संशयित पंपांची नावे निष्पन्न झाली आहेत. पेट्रोल पंपावर मापात माप करणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील २२ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. या टोळीच्या चौकशीत सांगली जिल्ह्यातील काही पंपांची नावे निष्पन्न झाली होती. त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून ठाण्याचे पथक जिल्ह्यात तळ ठोकून आहे. आतापर्यंत पथकाने भिलवडी (ता. पलूस), अंकली (ता. मिरज), बागणी, आष्टा (ता. वाळवा), तसेच तासगाव येथे छापे टाकले आहेत. टोळीतील संशयितांनी, सांगली साखर कारखान्याजवळील दोन पंपात मापात माप करण्यासाठी ‘चीप’ दिली आहे, अशी कबुली दिली होती. त्यामुळे दुपारी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके, उपनिरीक्षक अविनाश महाजन, हवालदार अंकुश भोसले, सुरेश यादव, संतोष सुर्वे, प्रशांत भुरके तसेच सांगलीच्या वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक किशोर चोरडिया, क्षेत्र सहाय्यक उदय कोळी, तसेच इंडियन आॅईलचे अभियंते यांनी संयुक्तपणे रविवारी दुपारी वसंतदादा कारखान्याच्या पंपावर छापा टाकला. या पंपावर पेट्रोल व डिझेल विक्रीची दोन यंत्रे आहेत. या दोन्ही यंत्रांची तासभर तपासणी करण्यात आली. पण त्यात आक्षेपार्ह असे काहीच आढळले नाही. कारखान्याच्या पंपाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पथकाने माधवनगर जकात नाक्याजवळ असलेल्या सदाशिव पेट्रोलियम या पंपावर तीन वाजता छापा टाकला. याठिकाणी पेट्रोल व डिझेलची तीन यंत्रे आहेत. ही सर्व यंत्रे उघडून त्यामधील पल्सर कार्ड व पॅनल कार्डची तपासणी केली. एक लिटर, दोन, तीन, चार व पाच लिटर असे पेट्रोल बाहेर काढून त्याचे माप तपासले. मात्र मापात कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत. पाच लिटरमागे दहा मि.लि. पेट्रोल जास्त जात असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. पंपाचे मालक सुधीर पाटील यांच्यावर सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. पेट्रोल-डिझेल खरेदी व्यवहाराच्या कागदपत्रांचीही तपासणी केली. पल्सर कार्ड बदलले आहे का?, याचीही तपासणी करण्यात आली.राज्यात १०९ पंपांवर छापेपोलिस निरीक्षक विकास घोडके म्हणाले, टोळीतील संशयितांनी मापात पाप करण्यासाठी भारतासह परदेशातही ‘चीप’ दिली आहे. राज्यातील १०९ पंपांची नावे निष्पन्न झाली होती. सांगली, कोल्हापूर, सातारा, ठाणे, नाशिक पुणे, औरंगाबाद, नागपूर, राजगड आदी जिल्ह्यांतील पंपांवर छापे टाकले आहेत. यातील ७० पंपांत दोष आढळून आले आहेत. लिटरमागे ४० ते १८० मि.लि.चा फरक आढळून आला आहे.तीन पंप ‘रडार’वरपोलिस निरीक्षक विकास घोडके म्हणाले, टोळीतील संशयितांनी सांगितलेल्या माहितीवरुन सांगली जिल्ह्यातील पंपांवर छापे टाकून तपासणी सुरु ठेवली आहे. अजूनही जिल्ह्यातील तीन पेट्रोलपंप ‘रडार’वर आहेत. येत्या एक-दोन दिवसात ही कारवाई पूर्ण केली जाईल. ज्या पंपांवर दोष आढळून आले आहेत, त्यांच्यावर लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल.