शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आठ हॉटेल्सवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:10 IST

सांगली : घाणीच्या साम्राज्यातच किचनमध्ये पदार्थ तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी पुन्हा दणका दिला. ...

सांगली : घाणीच्या साम्राज्यातच किचनमध्ये पदार्थ तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी पुन्हा दणका दिला. सांगली, मिरजेतील आठ हॉटेल्सवर एकाचवेळी छापे टाकले. हॉटेलसह किचनचीही तपासणी केली. यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.सर्व हॉटेल मालकांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली.चार दिवसांपूर्वी काँग्रेस भवनजवळील हॉटेल ‘नवरत्न’मध्ये अन्नपदार्थांमध्ये झुरळ आढळले होते. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने या हॉटेलवर छापा टाकून किचनची तपासणी केली होती. त्यावेळी भिंतीवर झुरळ आढळून आले. कांदा फरशीवर ठेवण्यात आला होता.प्रचंड घाणीच्या साम्राज्यातच पदार्थ तयार केले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने हे हॉटेल बंद करण्याची नोटीस बजावली. शनिवारपासून हॉटेल बंद आहे. यानिमित्ताने शहरातील सर्वच हॉटेल्समधील किचन आणि स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला.दरम्यान, ‘लोकमत’ टीमने शनिवारी शहरातील हॉटेल्सना भेट देऊन ‘स्टिंग आॅपरेशन’ केले होते. त्यावेळी किचनमध्ये घाणीचे साम्राज्य आढळून आले. ‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशनची अन्न व औषध प्रशासन विभागाने गंभीर दखल घेऊन हॉटेलच्या तपासणीसाठी ‘टास्क फोर्स’ तयार केला आहे. सोमवारी या टास्क फोर्सने सांगलीतील जिमखान्याचे रेस्टॉरंट हॉटेल हनुमान, हॉटेल विहार, हळद भवन कॅन्टीन, द्वारका स्वीटस् बेकर्स अ‍ॅण्ड केक शॉप, मिरजेतील हॉटेल अयोध्या, हॉटेल सुखसागर, अवनी थीम पार्क याठिकाणी छापे टाकून तपासणी केली. तेथे किचनमध्ये अस्वच्छता आढळून आली. फरशा फुटलेल्या होत्या. भिंती काळवंडल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती एस. व्ही. हिरेमठ, सुरेश दांगट व र. ल. महाजन यांनी ही कारवाई केली....अन्यथा परवाना निलंबितसहायक आयुक्त सुकुमार चौगुले म्हणाले, सर्व हॉटेल मालकांना त्यांच्या हॉटेलमध्ये आढळलेल्या त्रुटींचा समावेश करुन नोटीस बजावण्यात आली आहे. त्रुटींची पूर्तता येत्या आठ दिवसांत न केल्यास त्यांच्या हॉटेलचा परवाना निलंबित केला जाईल. मंगळवारपासून पुन्हा हॉटेलसह सर्व व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी केली जाणार आहे.