शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली,मिरजेत तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST

सांगली : शहरात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ते उद्‌ध्वस्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण ...

सांगली : शहरात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ते उद्‌ध्वस्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली. यात १६ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी तीन पथक तयार करत ही कारवाई केली.

विश्रामबाग येथील रेल्वे स्टेशन ते शंभरफुटी रोडवर असलेल्या एका टेरेसवर सुरु केलेला जुगारअड्डा उद्ध्वस्त केला. यात जुगारअड्डा मालक विजय गुराप्पा वडर, मारुती जगन्नाथ वडर, गणेश शिवाजी वाघ, अब्दुलगणी कुदुस साहेब (सर्व रा. वडर कॉलनी,सांगली) आणि अरुण शिवलिंग सावंत (रा. गंगानगर) यांना अटक करण्यात आली.

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसंतदादा क्रीडा संकुलातील व्यायाम शाळेच्या अंगणात जुगार खेळत बसलेल्या पाचजणांवर कारवाई करण्यात आली त्यात महमद इमाम डोणी (कत्तलखान्याजवळ,सांगली), महेश अशोक सकपाळ (गावभाग,सांगली), मुत्वयाण्णा सोमाण्णा दोडमणी, अनिकेत प्रकाश माने, विशाल वसंत पाटील (सर्व रा. सांगलीवाडी) यांना अटक करण्यात आली.

मिरज-म्हैसाळ रोडवर असलेल्या देवल मळा परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी कारवाई केली. यात जुगार अड्डा मालक सलीम रहमान फकीर, अर्थव अशोक पाटील, साहिल अफसर कुटवाडे, शानुर गजब्बर मकानदार, समीर दादुल झांबरे आणि पुंडलिक मल्लाप्पा वागण्णावर (सर्व रा. म्हैसाळ, ता.मिरज) यांना अटक करण्यात आली.

तिन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत रोख १० हजार २७० रुपयांसह २६ हजार १०० रुपये किमतीचे मोबाईल व जुगार साहित्य असा ३६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष सूर्यवंशी, निलेश कदम, अरुण औताडे, जितेंद्र जाधव, शशिकांत जाधव आदीच्या पथकाने ही कारवाई केली.