शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेमध्ये फूट

By admin | Updated: August 26, 2016 23:18 IST

पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोड्या : प्रदीप पाटील यांचा सवतासुभा; नेत्यांच्या वादात शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडण्याची भीती

सांगली : शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील गटात पुन्हा फूट पडणार असून, माजी खासदार शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त दि. २ सप्टेंबरला युवा आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सांगलीत शेतकरी मेळावा आयोजित केला असून, यास रघुनाथदादा पाटील यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलले आहे.शरद जोशी यांनी १९७८ मध्ये चाकण येथे पहिले कांदा आंदोलन केले. त्यानंतर १९८० मध्ये कांदा आणि ऊस उत्पादकांचे संयुक्त आंदोलन त्यांनी उभारले. त्यावेळी सांगली जिल्ह्यात ऊस उत्पादकांची साखर कारखानदारांकडून पिळवणूक सुरू होती. शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अस्वस्थ होता. तो अन्यायाविरोधात पेटून उठत होता. पण, नेतृत्व नसल्यामुळे कोणीच रस्त्यावर येत नव्हते. मौजे डिग्रज येथील जयपाल फराटे यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेठाण गावाला भेट देऊन, शरद जोशी यांच्याशी शेतीप्रश्नावर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व करावे, अशी गळ त्यांनी जोशी यांना घातली. त्यानुसार जोशी यांनी १९८१ मध्ये मौजे डिग्रजला भेट दिली. ऊसदराच्या प्रश्नावर चर्चा करून आंदोलन छेडण्याचे ठरले. तेव्हापासून आजअखेर जोशींच्या शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रभाव राहिला आहे. शेतकरी संघटनेने आवाहन केल्यानंतर शेतकरी रस्त्यावर उतरतो, याची साखर कारखानदार आणि व्यापारी, जिल्हा प्रशासनाला जाण आहे. शरद जोशी यांच्या हयातीतच संघटनेत उभी फूट पडून राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली होती. अलीकडेच रघुनाथदादा पाटील यांनी सवतासुभा मांडला होता. त्यातून जोशीप्रणित शेतकरी संघटना आणि रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, असे दोन गट पडले. जोशी यांनी अनेकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या मनोमीलनाचा प्रयत्न केला होता. पण, तो अयशस्वी झाला होता. आता रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेत पुन्हा आणखी फूट पडल्याचे दिसत आहे.रघुनाथदादांच्या गटाच्या शेतकरी संघटना युवा आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दि. २ सप्टेंबर रोजी शेतकरी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणराव वडले, शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव गोडसे, किसान पुत्र आंदोलनचे मार्गदर्शक अमर हबीब अशा दिग्गज शेतकरी नेत्यांना निमंत्रित केले आहे. शिवाय जोशीप्रणित शेतकरी संघटना आणि रघुनाथदादा पाटीलप्रणित शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही बोलाविले आहे.शेतकरी मेळाव्याचे भित्तीपत्रक काढले असून त्यावर दोन्ही संघटनेतील नेते व कार्यकर्त्यांचा उल्लेख आहे. या भित्तीपत्रकावर रघुनाथदादा पाटील यांच्या नावाचा उल्लेखही नाही. शिवाय, जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावेही दिसत नाहीत. मेळाव्यात ऊस दराच्या महत्त्वाच्या प्रश्नावर मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असेल, तर रघुनाथदादा पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांना का डावलले, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. शेतकरी संघटनेचा बिल्ला आणि जोशी यांचे छायाचित्र मात्र भित्तीपत्रकावर आहे. याचाच अर्थ शेतकरी संघटनेमध्ये फूट पडून तिसरा गट निर्माण झाल्याचे उघड दिसत आहे. प्रदीप पाटील यांनी रघुनाथदादा पाटील आणि युवा आघाडीचे संजय कोले यांना शह देण्यासाठी शेतकरी संघटनेतील नाराज नेत्यांना संघटित केल्याचे दिसत आहे. ‘चाबूकफोड’ आंदोलन महाराष्ट्रभर गाजविणारे बाळासाहेब कुलकर्णी यांनाही त्यांनी बरोबर घेतले आहे. कुलकर्णी यांची स्वच्छ प्रतिमा असल्याचा प्रदीप पाटील यांना फायदा होणार आहे. आता ‘स्वाभिमानी’सह शेतकरी संघटनांची संख्या चार झाली आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडून श्रेयवादाचेच राजकारण शेतकरी संघटनांमध्ये रंगणार की काय, अशी भीतीही उपस्थित होत आहे. कार्यकर्त्यांची अवस्था मात्र ‘जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो... साचले मोहाचे धुके घनदाट हो... आपली माणसं आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती... विठ्ठला... कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी झाली आहे.प्रदीप पाटील यांची संघटनेतून हकालपट्टीशेतकरी संघटनेतून प्रदीप पाटील यांची हकालपट्टी केली आहे. आमच्या संघटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. यामुळे भित्तीपत्रकावर माझे छायाचित्र आणि नाव छापण्याचा संबंधच येत नाही. याशिवाय, त्यांनी जे भित्तीपत्रकावर काही आमच्या कार्यकर्त्यांची नावे छापली आहेत. यापैकी काहीजणाशी मी दूरध्वनीवरून संपर्क केला आहे. या कार्यकर्त्यांनी आम्हाला न सांगताच त्यांनी नावे छापली असून त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.