शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंगप्रकरणी चौकशी अधिकारी नियुक्त

By admin | Updated: December 10, 2014 00:15 IST

पोलीसप्रमुखांची माहिती : मुलाची आत्महत्या ‘रॅगिंग’ला कंटाळूनच झाल्याची वडिलांची तक्रार

सांगली/पलूस : पलूस येथील केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सचिन लालासाहेब जावीर (वय १५, रा. गोमेवाडी, ता. आटपाडी) या दहावीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी तासगावच्या पोलीस उपअधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिली. दरम्यान, सचिनने ‘रॅगिंग’ला कंटाळूनच आत्महत्या केली असल्याची तक्रार त्याचे वडील लालासाहेब जावीर यांनी आज, मंगळवारी पलूस पोलिसांत केली. मात्र पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्याची कोणतीही कार्यवाही सुरु झालेली नाही.सचिन जावीर याने गेल्या आठवड्यात विद्यालयाच्या आवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी विद्यालय व्यवस्थापनाने, सचिनची अभ्यासात प्रगती नव्हती, त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर सचिनच्या वडिलांनी, माझ्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. या सर्व घडामोडींचा पोलीसप्रमुख सावंत यांनी आज, मंगळवारी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तासगावचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, आज विद्यालयात पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विद्यालयाचे प्राचार्य अशोक साळी म्हणाले की, सचिनने रॅगिंगमुळे आत्महत्या केली नाही. त्याची अभ्यासात प्रगती नव्हती, यातूनच त्याने आत्महत्या केली आहे. मला प्राचार्य पदाचा कार्यभार घेऊन केवळ दीड वर्ष झाले आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सचिनची अभ्यासात प्रगती नव्हती. त्यामुळे त्याने हे कृत्य केले आहे. विद्यार्थी व पालकांनी संयम राखावा. (प्रतिनिधी/वार्ताहर)समुपदेशकाची नियुक्ती करावीपालक मेळाव्यात पालकांनी सांगितले की, नवोदय विद्यालयात येणारी मुले घरातील सर्वांना सोडून येतात. त्यांची मन:स्थिती सांभाळणे गरजेचे आहे. यासाठी विद्यालयात समुपदेशकाची नेमणूक करावी. याबाबत तातडीने अंमलबजावणी केल्यास भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही. शाळा, महाविद्यालयात होतेय घुसमट !जिल्ह्यात महाविद्यालयातील तरुणांनी ‘रॅगिंग’च्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत आणि आजही घडत आहेत. आता हे प्रकार शाळांमध्येही सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. /हॅलो १