शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बोगस बांधकाम परवान्यांचे रॅकेट

By admin | Updated: April 9, 2017 23:46 IST

चौघांना अटक : घरमालकांविरुद्ध गुन्हे; महापालिका अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, शिक्क्याचाही वापर

सांगली : शहरात बोगस बांधकाम परवाने तयार करून त्या माध्यमातून कॉर्पोरेशन बँकेतून कर्ज घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी सध्या सहा घरमालकांविरुद्ध सांगली शहर, विश्रामबाग व संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील चौघांना अटक केली आहे. बोगस परवान्यांवर महापालिका अधिकाऱ्यांच्या हुबेहूब स्वाक्षऱ्या तसेच महापालिकेचे शिक्केही असल्याने, यामध्ये पालिकेतील कोणाचा सहभाग आहे का? याबद्दल गूढ निर्माण झाले आहे. अटक केलेल्यांमध्ये अशोक भूपाल राजोबा (वय ३४, रा. शारदा हौसिंग सोसायटी, कुपवाड रस्ता, सांगली), झाकीर हुसेन मुजावर (३५, कुपवाड), राजकुमार शिवदास राठोड (३५, अभयनगर) व अमोल यमनाप्पा जैनावर (२८, शामरावनगर), चांदणी चौकातील अजित बाळू शिंदे व शामरावनगरमधील मोरम्मा श्रीशैल मानशेट्टी या महिलेविरुद्धही गुन्हा नोंद आहे. पण त्यांना अद्याप अटक केलेली नाही. अटकेतील संशयितांना रविवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये सांगलीतील शिवाजीनगर येथील कॉर्पोरेशन बँकेकडे संशयितांनी बांधकाम परवाने सादर करून घरबांधणीसाठी कर्जाची मागणी केली होती. यासंदर्भात बँकेने १६ सप्टेंबर २०१६ रोजी महापालिकेच्या नगररचना विभागास लेखी पत्र देऊन, संशयितांनी सादर केलेले बांधकाम परवाने खरे आहेत का? याची माहिती सादर करण्यास कळविले होते. नगररचना विभागाने या परवान्यांची चौकशी केली. परवान्यावर अधिकाऱ्यांची सही तसेच पालिकेचा परवाना दिलेली तारीख होती. पण रेकॉर्डला परवाना दिल्याबाबत संशयितांच्या नावांची नोंद नव्हती. यावरून हे सर्व परवाने बोगस असल्याचे उघडकीस आले. पालिकेने संशयितांना नोटिसा पाठवून खुलासा करण्याची मागणी केली होती. परंतु संशयितांनी कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे महापालिकेचे दिलीप कोळी, वैभव वाघमारे, शामराव गेजगे यांनी शहर, विश्रामबाग व संजयनगर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हे दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी चार संशयितांना तातडीने अटक केली. (प्रतिनिधी)नगररचना विभागाचा हलगर्जीपणाकॉर्पोरेशन बँकेने सप्टेंबर २०१६ ला पालिकेच्या नगररचना विभागास, संशयितांनी दाखल केलेल्या बांधकाम परवान्याची माहिती विचारली होती. मात्र त्यांनी तातडीने कोणतीही चौकशी केली नाही. एका सामाजिक संघटनेने याला वाचा फोडून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी एका रात्रीत धावाधाव करुन संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये नगररचना विभागाचा हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येतो. बांधकाम परवान्यासोबत बांधकाम व्यावसायिकाचा आराखडाही जोडलेला आहे. या आराखड्यावर बांधकाम व्यावसायिकाचे नाव व सही आहे. या व्यावसायिकालाही खुलासा करण्यासाठी पालिकेने नोटिसा पाठविल्या होत्या. मिरजेतही गुन्हा दाखलमिरज : महापालिकेचे बोगस बांधकाम प्रमाणपत्र तयार करून बँकेकडे कर्जाची मागणी केल्याप्रकरणी मिरजेतील गजानन गणपत सरवदे (रा. वेअर हाऊस मागे मिरज) यांच्याविरूध्द गांधी चौकी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन सरवदे यांनी घरावर कर्ज घेण्यासाठी कॉर्पोरेशन बँकेच्या सांगलीतील शिवाजीनगर शाखेत बांधकाम परवानगीचे पत्र जोडले होते. बनावट नकाशेसंशयितांनी बांधकामाचा बनावट परवाना व नकाशे कुठे तयार केले, त्यासाठी लागणारा संगणक, प्रिंटर, शिक्के कोठून तयार केले, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, आणखी कोणाला हे बोगस परवाने दिले आहेत का, याचा तपास पोलिस करणार आहेत. या सर्व मुद्यांवर तपास करण्यासाठी संशयितांना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी त्यांनी न्यायालयास केली होती.