शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पशुचिकित्सकांचे प्रश्न शासनदरबारी मांडू

By admin | Updated: November 30, 2015 01:16 IST

शिवाजीराव नाईक : सांगलीत विभागीय मेळाव्यात प्रतिपादन

सांगली : शेती व्यवसाय अडचणीत असताना शेतकऱ्यांसाठी आधार देणाऱ्या पशुचिकित्सकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार शिवाजीराव नाईक यांनी रविवारी सांगलीत दिली. पशुचिकित्सक व्यवसायी संघटनेचा पुणे विभागीय मेळावा व राज्य कार्यकारिणी सभा असा संयुक्त कार्यक्रम सांगलीत झाला. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती मनीषा पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष सुनील काटकर, सरचिटणीस मारुती कानोळे, कार्याध्यक्ष ज्ञानेश गांगर्डे, कोषाध्यक्ष श्रीनिवास देशमुख, व्ही. ए. खंदारे, पी. वाय. साळुंखे, बी. एन. राजमाने, अशोक आटगुडे उपस्थित होते.आ. नाईक म्हणाले,पशुसंवर्धन विभागात सर्वात महत्त्वाचा व प्रत्यक्ष जनावरांच्या गोठ्यापर्यंत जाऊन सेवा देण्याचे काम हा घटक करतो. मात्र त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र आपण स्वत: याप्रकरणी लक्ष घालू. पशुचिकित्सकांचे प्रश्न शासन दरबारी मांडू.जि. प. च्या कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील यांनीही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या घटकाचे प्रश्न शासन दरबारी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजीर चौगुले यांनी स्वागत केले. राज्य संघटनेचे अध्यक्ष काटकर यांनी पशुचिकित्सकांच्या प्रश्नांची माहिती दिली. शासन व जिल्हा परिषद सेवेतील पदविका, प्रमाणपत्रधारक यांना पुनश्च व्यावसायिक नोंदणी प्राप्त व्हावी, तोपर्यंत राज्य शासनाच्या अधिकारात बिगर पदवीधारकांना स्वतंत्र व्यवसायाची परवानगी मिळावी, पशुधन विकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी गट ब या पदोन्नत्या कराव्यात, ग्रामसेवक, कृषीसहायक यांच्या धर्तीवर पशुचिकित्सक कर्मचाऱ्यांनाही दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता देण्यात यावा, यासह विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. (प्रतिनिधी)संघटनेच्या मागण्यापशुधन विकास अधिकारी व गट ब या पदोन्नत्या कराव्यात, ग्रामसेवक, कृषीसहायक यांच्या धर्तीवर पशुचिकित्सक कर्मचाऱ्यांनाही दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता देण्यात यावा, या मागण्या करण्यात आल्या.