शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुणनियंत्रण अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव

By admin | Updated: February 11, 2016 00:31 IST

तासगाव पंचायत समिती सभा : चारा छावण्या सुरु करण्याची मागणी; कृृषी विभागाचा वादग्रस्त कारभार

तासगाव : तासगाव पंचायत समितीकडील गुणनियंत्रण अधिकाऱ्यांचा कार्यभार प्रभारी असल्यामुळे कामे मार्गी लागत नाहीत. याबाबत लोकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांची बदली करण्याचा ठराव पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला. तसेच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, या माणगीचा ठरावदेखील करण्यात आला.सभापती सुनीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा झाली. यावेळी उपसभापती अशोक घाईल, गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्यासह सर्व पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते. तासगाव पंचायत समितीच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांबाबत औषध विक्रेते, नागरिकांच्या तक्रारी होत्या. विटा पंचायत समितीत शिल्लक राहिलेले औषध फवारणी पंप तासगाव तालुक्यातील कृषी विक्रेत्यांना सक्तीने विकण्यात आले होते. याबाबत ‘लोकमत’मधून बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत पंचायत समितीच्या सदस्यांनी सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार होत असल्याची टीका सदस्य चंद्रकांत पाटील यांनी केली. चुकीचे प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन गुणनियंत्रण अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव यावेळी घेण्यात आला. तसेच पूर्णवेळ गुणनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या मागणीचाही ठराव यावेळी घेण्यात आला.तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, असा ठरावही यावेळी करण्यात आला. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे मागणी असेल त्या ठिकाणी तातडीने टँकर उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणीही यावेळी सदस्यांनी केली. प्रादेशिक पाणी योजनेच्या पाणीपट्टीची एकूण मागणी आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने, या योजनांसाठीचे वीज बिल व्यावसायिक पध्दतीने आकारणी होत आहे. त्यामुळे वाढीव रक्कम शासनाने भरावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.ज्ञानरचनावादासाठी शासनाकडून मदत द्या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतून ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीचा अवलंब केला जात आहे. विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षण पध्दती उपयोगी आहे. मात्र काही शाळा जुन्या आणि अपुऱ्या वर्गखोल्या असल्यामुळे त्यांना चांगली सुविधा देता येत नाही. त्यामुळे अशा शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.चारा छावण्या, टँकर सुरु करातासगाव तालुक्यात सध्या भीषण टंचाईची परिस्थिती आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, या मागणीचा ठराव तासगाव पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला. तसेच मागणी असेल त्या ठिकाणी तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्याच्या मागणीचा ठराव सभेत करण्यात आला