शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

दडवून ठेवलेल्या विचारांची राज्यात उबळ

By admin | Updated: December 5, 2015 00:21 IST

जयंत पाटील : येडेमच्छिंद्र येथे नाना पाटील यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे उद्घाटन

शिरटे : क्रांतिसिंह नाना पाटील यांची कर्मभूमी राज्यव्यापी होती. आयुष्यभर धर्मनिरपेक्ष विचारसरणी जोपासताना त्यांनी जातीय विचारसरणीला कधीही खत-पाणी घातले नाही. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या नेत्यांच्या होणाऱ्या हत्येला एक अर्थ असून, दडवून ठेवलेल्या विचारांची उबळ आता सर्वत्र येत आहे. हत्या करणाऱ्या या विचारांच्या विरोधात आता लढा उभारण्याची गरज असल्याचे मत माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे उद्योजक सर्जेराव यादव यांनी स्वखर्चातून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा व परिसराच्या केलेल्या सुशोभिकरणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार विश्वासराव पाटील, मोहनराव कदम, अरुण लाड, अ‍ॅड. सुभाष पाटील, गौरव नायकवडी, अलकाताई पुजारी, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुश्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.जयंत पाटील व मान्यवरांच्याहस्ते उद्योजक सर्जेराव यादव व त्यांच्या पत्नी माधुरीताई यादव यांचा सत्कार करण्यात आला. सर्जेराव यादव प्रतिष्ठानच्यावतीने हौसाताई पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. सुभाष पाटील, क्रांतिमाता कुसूमताई नायकवडी यांच्यावतीने सरपंच गौरव नायकवडी, माजी जिल्हा परिषद सदस्या अलकाताई पुजारी, सरपंच संजय पाटील, उपसरपंच मनीषा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.अ‍ॅड. संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. गोपाल पाटसुपे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले.यावेळी हणमंतराव पाटील, दिलीपराव देसाई, बबनराव सावंत, रमेश पाटील, महिपती पाटील, अजित पाटील, बाबूराव पाटील, अंजनाताई पाटील, सर्जेराव पाटील, विश्वास खंडागळे, अभिमन्यू पाटील, युवराज पाटील, शरद साळुंखे, आनंद पाटील, संदीप स्वामी, दिलीप पाटील, सुरेश पाटील, प्रताप पाटील, सुभाष चव्हाण, शरद पाटील, हौसेराव पाटील, शिवाजी पाटील, दिनकर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)क्रांतिसिंहांची प्रेरणा : युवकांना मार्गदर्शक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यामुळे वाळव्याची ओळख देशभरात पोहोचली. त्यांच्याच प्रेरणेतून नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखली स्वातंत्र्यसैनिकांची आख्खी पिढी पारतंत्र्यात स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहिली. यातूनच क्रांतिसिंहांचे विचार उमटत राहिले. भावी पिढ्यांना त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.