शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

चुकीचे वागणाऱ्या पोलिसांनाही शिक्षा

By admin | Updated: June 14, 2016 00:05 IST

दत्तात्रय शिंदे : चांगले काम करून बक्षीस मिळविण्याचे अधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन

सांगली : चांगले काम करा, बक्षीस मिळवा. पण वाईट काम केल्यास तुम्हाला शिक्षा करायला हयगय करणार नाही, असा इशारा नूतन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी सोमवारी पोलिस अधिकाऱ्यांना दिला. कामात निष्काळजीपणा नको. पोलिस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्याला सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. जिल्हा पोलिसप्रमुख पदाची सूत्रे घेतल्यानंतर २४ तासांच्या आतच शिंदे यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांची तातडीने मुख्यालयात बैठक घेतली. पहाटे चार वाजताच अधिकाऱ्यांना बैठक असल्याचा निरोप देण्यात आला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांची पहाटेपासूनच धावपळ सुरू होती. बैठकीतील माहिती देताना शिंदे म्हणाले की, सर्व अधिकाऱ्यांना कामाची रुपरेषा कशी असावी, याबद्दल मार्गदर्शन केले आहे. जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे बंद झाले पाहिजेत. यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. पथकाने एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर धंद्यावर छापा टाकला, तर त्याला संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल. ज्याअर्थी धंदे सुरु असल्याचे छाप्यात उघडकीस येते, त्याअर्थी संबंधित ठाण्याच्या अधिकाऱ्याचे त्याला अभय असल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे बेकायदेशीर धंदे कोणत्याही प्रकारचे असोत, ते बंद झाले पाहिजेतच.शिंदे म्हणाले, जिल्ह्यात खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यातील अनेक गुन्ह्यांचा छडा लागला नाही. या प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हा घडला की, तो तातडीने दाखल करण्याची सूचना केली आहे. कोणाच्या दबावाखाली गुन्हे दाखल करु नयेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास नेहमीच प्राध्यान्य दिले पाहिजे. एखादी माहिती मिळाली, तर त्याची तातडीने खातरजमा करावी. यासाठी जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे. दैनंदिन कोणतेही काम असो, यामध्ये निष्काळजीपणा करु नये. चांगले काम केल्यास नेहमीच पाठीवर शाबासकीची थाप मिळेल, तसेच बक्षीसही दिले जाईल. पण वाईट काम केल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षा करायला हयगय करणार नाही, असा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)शिंदे म्हणाले, वाहतूक नियम चांगल्याप्रकारे करावेत, अशी सूचना केली आहे. वाहनधारकांना मुद्दाम अडवून, त्रास देऊ नये. वाहतुकीची कोंडी होऊ नये, अपघात घडू नयेत, याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत समस्या असल्यास त्या जरूर मांडाव्यात, असेही सांगितले आहे.दलाची अबू्र : ठाणे अंमलदाराच्या हातीशिंदे म्हणाले, पोलिस ठाण्यात येणारा माणूस हा सामान्य तक्रारदार असतो. अनेकदा काही लोकांनी पोलिस ठाण्याची पायरीही चढलेली नसते. त्यामुळे तो दबकतच येतो. तो आल्यानंतर प्रथम त्याला ठाणे अंमलदाराची खोली दिसते. तिथे तो जातो. त्यामुळे ठाणे अंमलदाराने येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी सौजन्याने वागावे. ठाणे अंमलदाराकडून मिळणारी वागणूक ही सौजन्याची असली पाहिजे. याबाबत माझ्याकडे तक्रार येता कामा नये. तक्रारदाराचे ऐकून घेतले पाहिजे. गुन्हा दाखल होत असेल तर दाखल करावा. होत नसेल तर त्याला समजावून सांगावे, अशी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. पोलिस दलाची जी अब्रू आहे, ती ठाणे अंमलदाराच्या हातात आहे. तिथे मिळणारी वागणूक ही महत्त्वाची असते. सिंधुदुर्गला बक्षिसासाठी निधी कमी पडला...शिंदे म्हणाले, सिंधुदुर्ग येथे असताना चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बक्षीस देताना कमी पडलो नाही. बक्षिसाचा निधी मर्यादित असतो. पण तोही संपला. पण मार्च २०१६ मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवून आणखी पाच लाखाचा निधी मंजूर करुन घेतला. त्यामुळे सांगली पोलिस दलातील अधिकाऱ्यांनीही नेहमीच चांगले काम करावे. त्यांना बक्षीस देण्यात कमी पडणार नाही.