शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी प्रकल्पासाठी पुण्याची समुद्रा कंपनी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST

सांगली : महापालिकेच्या ६० कोटी रुपयांच्या एलईडी प्रकल्पासाठी पुण्याची समुद्रा इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम व मुंबईतील ‘ई-स्मार्ट’ प्रायव्हेट लिमिटेड या दोन ...

सांगली : महापालिकेच्या ६० कोटी रुपयांच्या एलईडी प्रकल्पासाठी पुण्याची समुद्रा इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम व मुंबईतील ‘ई-स्मार्ट’ प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी स्पर्धा सुरू होती. काही मुदतबाह्य प्रमाणपत्रे व कागदपत्रांमुळे ‘ई-स्मार्ट’ची निविदा अपात्र ठरली आहे. त्यामुळे स्पर्धेत केवळ पुण्याची समुद्रा कंपनी उरली आहे. आता एजन्सी नियुक्तीचा अंतिम निर्णय स्थायी समितीच्या सभेत होणार आहे.

महापालिका क्षेत्रात ३२ हजार पथदिवे आहेत. राज्य शासनाने ईईएसएल या खासगी कंपनीला एलईडी पथदिवे बसवण्याचा ठेका दिला होता. मात्र कंपनीच्या अटी व शर्तीमुळे महापालिकेला १५ ते २० कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागणार होता. त्यामुळे ईईएसएल कंपनीपेक्षा कमी दराने एलईडी दिवे बसवून देणाऱ्याला ठेका देण्याचा ठराव महासभेने केला. त्यास नगर विकासने मान्यता दिली. त्यानुसार निविदा मागवल्या आहेत. तीनदा मुदतवाढ देऊनही दोनच निविदा आल्या होत्या. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी या दोन्ही निविदा उघडण्याची सूचना दिली होती. कागदपत्रांच्या छाननीनंतर आर्थिक लिफाफा क्रमांक दोन उघडण्यात आला.

यात समुद्रा कंपनीची निविदा पात्र ठरली आहे. ई-स्मार्टच्या निविदेतील काही प्रमाणपत्रे मुदतबाह्य होती. काही कागदपत्रे नव्हती. संधी देऊनही कागदपत्रे मुदतीत सादर करता आली नाहीत. त्यामुळे ‘ई-स्मार्ट’ची निविदा अपात्र ठरविण्यात आली आहे. ‘समुद्रा’च्या निविदेतील एलईडी बल्बची ऊर्जा बचत ८४.५ टक्के आहे, असे उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले.

एलईडी पथदिवे प्रकल्प ६० कोटीचा आहे. ही रक्कम संबंधित निविदाधारकाला वीज बिल बचतीतून मिळणार आहे. एलईडी दिवे बसविल्यानंतर वीज बिलात होणारी बचत रक्कम ठेकेदाराला दिली जाणार आहे. या बचत रकमेतील पाच टक्के रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. एलईडी पथदिवे बंद पडल्यानंतर २४ तासात बल्ब बदलून देण्याचे बंधन ठेकेदारावर आहे.

चौकट

स्थायी समितीत होणार फैसला

लवकरच प्रशासनाकडून निविदा मान्यतेचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला जाणार आहे. ठेकेदार नियुक्तीचा फैसला स्थायी समिती सभेत होणार आहे.