शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वायुसेनेतील करिअरसाठी तरतूद करणार

By admin | Updated: October 17, 2016 00:41 IST

चंद्रकांत पाटील : सांगलीत ‘करिअर संधी’ मार्गदर्शन शिबिर

सांगली : जिल्ह्यातील सैन्यदलात विशेषत: वायुदलात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या विद्यार्थ्यांना पुस्तके, संगणक बाबींची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत केले. वायुसेना, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि सांगली शिक्षण संस्था यांच्यावतीने आयोजित ‘भारतीय वायु सेनेमधील करिअर संधी’ या मार्गदर्शन शिबिरात पाटील बोलत होते. पाटील म्हणाले की, वायुसेनेमधील अधिकारी पदाच्या करिअर संधी व निवड प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून निवड प्रक्रिया प्रसार व प्रदर्शन वाहन तयार केले आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनही यासाठी तरतूद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त), सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रणजितसिंह सूर्यवंशी, कर्नल डी. एम. रानडे (निवृत्त), विंग कमांडर ए. एस. जोसेफ, फ्लाईट लेफ्टनंट दीपिका खजुरिया, फ्लाईट लेफ्टनंट प्रदीप, फ्लार्इंग आॅफिसर असीम गर्ग आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी) सैनिकांच्या वारसांचा सन्मान सेवा बजावत असताना मृत्यू झालेल्या सैनिकांच्या वारसांना आर्थिक मदतीचे वाटप पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यात संगीता पाटील (डफळापूर), वर्षा चौगुले (कुपवाड), चंद्रभागा पोळ (शाळगाव) यांना धनादेश देण्यात आले. राजू धोंडिराम साळुंखे (डोंगरसोनी) यांना सेवा बजावताना अपंगत्व आल्यामुळे त्यांना ताम्रपट पुरस्कार देण्यात आला.