शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीच्या नुकसानीची भरपाई द्यावी

By admin | Updated: December 15, 2014 00:00 IST

जयंत पाटील : अधिवेशनात याप्रश्नी आवाज उठविणार

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी तासगाव तालुक्यातील विसापूर गावाला भेट देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागा, शाळू, हरभरा, मका व ऊस पिकांची पाहणी केली़ शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून द्राक्ष बागायत शेतक-यांना एकरी २ लाख तसेच शाळू, हरभरा, मका व ऊस पीक उत्पादक शेतकऱ्यांनाही भरीव नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली़ आम्ही हा विषय अधिवेशनात प्रभावीपणे मांडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ यावेळी शेतकऱ्यांनी गावाची आणेवारी चुकीची झाल्याचे आ़ पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून फेरआणेवारी तातडीने करावी, अशी सूचना केली.आ़ पाटील यांनी रविवारी दुपारी विसापूर येथील बापूसाहेब माने, शिवाजी माळी, अनिल माने यांच्या द्राक्षबागा, बाळासाहेब माने, भीमराव मंडले यांचे शाळू पीक, तर संपतराव माने यांच्या ऊस पिकाची पाहणी केली़ यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या सभागृहात शेतकरी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली़ प्रारंभी माजी सभापती सुनील पाटील म्हणाले, १२ डिसेंबरला आमच्या गावात वादळी वारा, गारासह अवकळी ८६ मिलिमीटर पाऊस झाला़ या पावसामध्ये आमच्या अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांसह शाळू, हरभरा, मका व ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे़ शासनाने आमच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून आम्हास नुकसानभरपाई द्यावी. एका शेतकऱ्याने माझी बाग निर्यातीसाठी २0 लाख रुपयांना दिली आहे़ ती १४ तारखेस तोडली जाणार होती; मात्र १२ तारखेलाच पाऊस होऊन बागेचे नुकसान झाल्याचे सांगितले़ कृषी अधिकारी शिंदे म्हणाले, आता उभ्या असलेल्या द्राक्ष बागातील द्राक्षे चिरली असून, दावण्या अळीने ८ ते १0 दिवसात द्राक्षांचे घड गळून पडू शकतात़आ़ पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये या नुकसानीची तीव्रता शासनाच्या निदर्शनास आणून देऊ़ शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देऊ़ याप्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष शंकरदादा पाटील, माजी सभापती पतंगबापू माने, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, माजी सभापती शैलेंद्र सूर्यवंशी, सरपंच सौ़ मंगल शिवणकर, उपसरपंच चव्हाण, तलाठी तसेच शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)