कामेरी : केंद्र शासनाने गॅस दरवाढ कमी न केल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने केली जातील, असा इशारा सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष छाया पाटील यांनी दिला.
कामेरी (ता. वाळवा) येथे सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तलाठी कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध केला. यावेळी त्या बोलत होत्या. छाया पाटील यांनी तलाठी रामेश्वर शिंदे यांना निवेदन दिले.
यावेळी डाॅ. सारिका पाटील, अलका बाबर, पं.स. सदस्या धनश्री माने, शारदा माळी, सजाक्का पवार, अलका पाटील, मंगलाताई बिळासकर, सुभद्रा पाटील, वर्षा चौगुले, चंद्रभागा कुंभार, शैलजा पाटील, सुनीता जाधव आदींसह महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.