शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात काँग्रेसतर्फे निदर्शने

By admin | Updated: January 23, 2016 00:50 IST

केंद्र, राज्य शासनाचा निषेध : दुहेरी खुनाची सीबीआय चौकशीची मागणी

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा सीबीआयमार्फत तपास करून सूत्रधारांचा छडा लावा, तालुक्यातील गुंडगिरी आणि अवैध धंदे मोडीत काढा, यांसह हैदराबादमधील मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित मंत्री व विद्यापीठाच्या कुलगुरुंवर कारवाई करा, या मागणीसाठी शुक्रवारी शहर काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. तसेच जातीयवादी केंद्र-राज्य सरकारचा निषेध केला.येथील जुन्या तहसील कचेरीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार रूपाली सरनोबत यांना निवेदन देण्यात आले. जितेंद्र पाटील म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजप सरकार जातीयवादी आहे. भांडवलदारांचे संरक्षण करणारे हे सरकार आहे. दलित-अल्पसंख्य समाज दहशतीच्या वातावरणात आहेत. याचा आम्ही निषेध करतो. इस्लामपूरचे दादासाहेब पाटील म्हणाले की, इस्लामपूर शहरात गुंडगिरी फोफावली आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या खुनातील सूत्रधार नामानिराळे राहिले आहेत. त्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी.प्रतापराव मोरे म्हणाले की, तालुक्यात खमक्या पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे. अ‍ॅड. आर. आर. पाटील म्हणाले की, पुरोगामी तालुक्यात चार महिन्यात सहा खून पडले. दुहेरी खुनात चोरीची शक्यता नाकारणारे पोलीस आता चोरीतून खून झाल्याचे सांगत आहेत. पण हे न पटणारे आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी रोहित चक्रवर्ती वेमुला याच्या आत्महत्येचा सखोल तपास करावा, याप्रकरणी केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्यासह कुलगुरुंवर कारवाई करावी, वाळवा तालुक्यातील मटका बंद करावा, डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या खूनप्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशा मागण्या तहसीलदार सरनोबत यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी निषेधाच्या घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या. यावेळी दादासाहेब पाटील (बोरगाव), राजू वलांडकर, दीपक लकेसर, पी. वाय. शिंदे, हिंदुराव वाटेगावकर, अनिल निकम, पृथ्वीराज पाटील, डी. आर. पाटील, नामदेव यादव, राजू सावकर, धनाजी सावंत, अर्जुन खरात, मिलिंद पाटील, आकिब नायकवडी, प्रवीण जाधव, भाऊ पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)इस्लामपुरात गुंडगिरी : बंदोबस्ताची मागणीइस्लामपूर शहरात गुंडगिरी फोफावली आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या खुनातील सूत्रधार नामानिराळे राहिले आहेत. त्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. तालुक्यात खमक्या पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे, अशी मागणी यावेळी अनेक आंदोलनकर्त्यांनी केली.