शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, मिरजेत वकिलांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: December 12, 2014 23:34 IST

कामकाजावर बहिष्कार : उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात करण्याची मागणी

सांगली : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी आज, शुक्रवार वकील संघटनेच्यावतीने न्यायालयीन कामजावर बहिष्कार टाकण्यात आला. न्यायालयाच्या परिसरात दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश जाधव यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.गेल्या दोन वर्षांपासून सांगलीसह सहा जिल्ह्यांतील वकिलांचे खंडपीठासाठी आंदोलन सुरु आहे. गतवर्षी तब्बल महिनाभर आंदोलन झाले होते. मात्र खंडपीठ करण्याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. यामुळे सहा जिल्ह्यांतील वकिलांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. न्यायालयीन कामकाजापासून शेकडो वकील अलिप्त राहिल्याने त्याचा मोठा परिणाम झाला. वकिलांनी दिवसभर न्यायालयाच्या परिसरात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात अ‍ॅड. महेश जाधव, सहायक सरकारी वकील एस. एम. पखाली, सचिन पाटील, अरविंद देशमुख, प्रदीप पोळ, अ‍ॅड. सुधीर जाधव, अ‍ॅड. अर्चना पाटील, अशोक वाघमोडे, प्रकाश साळुंखे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मिरज : मिरजेत वकिलांनी धरणे आंदोलन करून कामकाजावर बहिष्कार टाकला. उच्च न्यायालयाच्या आश्वासनावरून खंडपीठ कृती समितीने आंदोलन स्थगित केले होते. मात्र खंडपीठाचे आश्वासन पूर्ण न झाल्याने कृती समितीने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. मिरजेत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून वकील संघटनेने न्यायालयाच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन केले. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. फैय्याज झारी, अ‍ॅड. मनीष कांबळे, अ‍ॅड. महेंद्र कोरे, अ‍ॅड. उमेश बावचीकर, अ‍ॅड. संभाजी बंडगर, अ‍ॅड. समीर हंगड, अ‍ॅड. चिमण लोकूर, अ‍ॅड. एस. एस. इसापुरे आदी आंदोलनात सहभागी होते.महालोकअदालतीवर आज बहिष्कारउद्या (शनिवार) न्यायालयात महालोकअदालत आयोजित केली आहे. यामध्ये हजारो खटले निकालात काढण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र यावरही वकिलांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे न्यायालयीन व्यवस्था, प्रशासन, पोलीस यांनाच ही महालोकअदालत यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.