मिरज : सोशल मीडियाव्दारे महापुरुषांच्या बदनामीचा मिरजेतील विविध पक्ष व संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. मिरजेतील विविध पुरोगामी संघटनांतर्फे प्रांताधिकारी व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी आवटे यांना निवेदन देण्यात आले. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रसिध्द करून जातीय तणाव निर्माण करणार्या व अफवा पसरवणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिध्द करणार्या आरोपीची नार्को चाचणी करण्याचीही मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. मिरज विकास संघाचे अध्यक्ष जैलाब शेख, जनसेवा समितीचे रोहित चिवटे, राष्ट्रवादीचे सचिन कांबळे, प्रा. गौतम काटकर, रेल्वे प्रवासी संघाचे अल्लाबक्ष काझी, युवक काँग्रेसचे जहीरभाई मुजावर, नासिर मगदूम, गौस मुल्ला, प्रदीप वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. महापुरुषांची बदनामी करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे करण्यात आली. पक्षाचे महासचिव दस्तगीर मलीदवाले, मिरज तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिन आवळे, सुनील होवाळे, प्रमोद धनसरे, जमीर जमादार, युसूफ शेख, प्रमोद मोरे उपस्थित होते. (वार्ताहर) काँग्रेसची कारवाईची मागणी सोशल मीडियाव्दारे महापुरुषांची बदनामी करणार्या समाजकंटकांना कठोर शिक्षा करण्याची मागणी काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांनी केली. याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. या घृणास्पद प्रकारामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या व जनतेच्या भावना दुखावल्या असल्याचे जाधव यांनी सांगितले. या समाजकंटकांना पकडून कठोर शिक्षा करण्याची मागणीही निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी नरेंद्र मोहिते, सुनील शेडबाळे, हणमंत पाटील, अमोल पाटील, धनराज जाधव, मुकेश कोलप, रमेश राजमाने उपस्थित होते.
महापुरुषांच्या बदनामीचा निषेध
By admin | Updated: June 3, 2014 01:24 IST