केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी विधेयकांच्या निषेधार्थ दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास कवठेमहांकाळ तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र सरकार दडपण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याबद्दल निषेध केला. केंद्र सरकारने संमत केलेले शेतकरीविरोधी विधेयक त्वरित मागे घ्यावे आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा, असे पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावे तहसील कार्यालयाला दिले. शेतकरी विधेयकांना विरोध करत काँग्रेस, राष्ट्रवादी, किसान सभा, बसपा, आदिवासी विकास संघ, बळीराजा पार्टीने तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत, चक्का जाम आंदोलन केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुरव, बाळासाहेब रास्ते, राजाराम घोरपडे, अविराजे शिंदे, चैतन्य पाटील, मुबारक मुल्ला, संपत नरळे, शंकर माने, दिगंबर कांबळे, गुलाब मुलानी, बाळासाहेब रास्ते, संजय कोळी, अंबादास जाधव, सचिन कोडग, सूरज पाटील, भगवान सोनंद, समीर गाडे यांसह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.