शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

महिला वाहकांना संरक्षण द्या

By admin | Updated: June 14, 2014 01:35 IST

कोणतेही कारण नसताना मारहाण

सांगली : डोंबिवली येथे दीपमाला सोनवणे या महिला वाहकाला कोणतेही कारण नसताना मारहाण झाली होती. या घटनेचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे सांगलीत निषेध करण्यात आला. तसेच महिला वाहकांना गुंडांकडून होणाऱ्या मारहाणीमुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे, विलास यादव यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी बोलताना बिराज साळुंखे म्हणाले की, डोंबिवली येथे दीपमाला सोनवणे या महिला वाहकाला बेदम मारहाण केली. गुंडाकडून मारहाण होत असताना प्रवाशांनी कुणीही सोडविले नाही. चालकाने आणि दुसऱ्या बसच्या महिला वाहकाने मारहाण सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या गुडाने चालक व अन्य वाहकालाही मारहाण केली होती. त्यानंतर विटा येथे पूनम मोरे, मिरजेत नंदा जोडके, नेहा पाटील यांनाही मारहाण झालेली आहे. मारहाणीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी महिला वाहकांना शासनाने पोलीस संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाचे व्यवस्थापक, पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीसप्रमुख, विभाग नियंत्रकांना मागणीचे निवेदन दिले आहे. आंदोलनामध्ये एसटी कर्मचारी नरिला आत्तार, वैशाली जाधव, हेमलता कोकाटे, श्रुती देशपांडे, साधना माने, शमू मुल्ला आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)