शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वेश्या व्यवसाय; कडेगावच्या वकिलास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:18 IST

सांगली : सांगली व सातारा जिल्ह्यात वेश्या व्यवसायासाठी मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीत रायगाव (ता. कडेगाव) येथील राहुल ऊर्फ दादासाहेब ...

सांगली : सांगली व सातारा जिल्ह्यात वेश्या व्यवसायासाठी मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीत रायगाव (ता. कडेगाव) येथील राहुल ऊर्फ दादासाहेब संभाजी पवार (वय ३५) या वकिलाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून उजेडात आली आहे.त्याला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून आलिशान मोटारही जप्त करण्यात आली आहे. तो मुंबईतील वाशीमधून मुलींची तस्करी करीत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली असल्याचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी सांगितले.वेश्या व्यवसायासाठी मुलींची तस्करी केल्याप्रकरणी दत्तात्रय महादेव नाईक (२६, रा. आरग, ता. मिरज) व नीशा राकेश जाधव (१९, कोल्हापूर) यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.त्यांच्या ताब्यातून एका पीडित मुलीची सुटका करण्यात आली होती. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून राहुल पवार याचे नाव निष्पन्न झाले होते. त्यानेच त्याच्या आलिशान मोटारीतून वेश्या व्यवसायासाठी मुलीला सांगलीत आणून दत्तात्रय नाईक व नीशा जाधव या दोघांच्या ताब्यात दिलेहोते.पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, पलूसचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा रायगाव येथे छापा टाकून राहुल पवार याला अटक केली. त्याच्या घराबाहेर मुलींच्या तस्करीसाठी वापरण्यात येणारी मोटार (क्र. एमएच १४ बीएक्स-६४९२) होती. तीही जप्त करण्यात आली. रविवारी दुपारी पवारला न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाआहे.