शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

समृध्दी पॉलिएक्स्ट्रूजपनला आग; अडीच कोटींचे नुकसान

By admin | Updated: April 17, 2016 00:42 IST

शॉर्टसर्किटने दुर्घटना : सरकी बियाणे, पेंड, बारदान जळून खाक

कुपवाड : मिरज औद्योगिक वसाहतीमधील समृध्दी पॉलिएक्स्ट्रूजन या सरकी पेंड आणि आॅईल तयार करणाऱ्या कारखान्याला शुक्रवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटने भीषण आग लागली़ आगीत सरकी बियाणे, पेंड, बारदान जळून सुमारे अडीच कोटींचे नुकसान झाले. याप्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता़ जयसिंगपूर येथील शशिकांत गुलाबचंद मालू यांच्या मालकीचा मिरज औद्योगिक वसाहतीमधील समृद्धी पॉलिएक्स्ट्रूजन हा कारखाना आहे. २०१२ मध्ये सुरू झालेला हा कारखाना गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता़ शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कारखान्यात शॉर्टसर्किट होऊन आग लागली़ आत सरकी पेंड, बारदानचा मोठा साठा असल्याने आग भडकली़ आगीने रौद्र रूप धारण केल्यावर लगतच्या कारखान्यातील कामगार व रखवालदाराने एमआयडीसी पोलिस ठाणे आणि एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्रास माहिती दिली़ त्यांच्यासह महापालिकेच्या अग्निशामन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले़ एमआयडीसी, महापालिका, तासगाव नगरपालिकेच्या अग्निशामन बंबांनी ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. आग शनिवारी रात्रीपर्यंत धुमसत होती़ आगीमध्ये साडेसातशे टन सरकी बियाणे, शंभर टन पेंड, साठ हजार बारदान (पोती) जळून खाक झाली़ कारखान्याच्या शेडचेही नुकसान झाले आहे़ घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे मालक शशिकांत मालू, महापालिकेचे अग्निशामन अधिकारी शिवाजीराव दुधाळ, सांगली- मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे व्यवस्थापक गणेश निकम आदींनी धाव घेतली़ घटनास्थळी बघ्यांनीही गर्दी केली होती़ याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता़ (वार्ताहर)