शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांचे ठराव आजपासून

By admin | Updated: January 21, 2015 00:21 IST

जिल्हा बँक निवडणूक : प्रारुप मतदार यादी करण्याचा कार्यक्रम सुरू

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. उद्या बुधवारपासून विकास सोसायट्यांच्या प्रतिनिधींचे ठराव घेण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, सोसायट्यांना २० फेब्रुवारीपर्यंत प्रतिनिधी ठराव द्यावयाचे आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ३१ मेपूर्वी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आता विभागीय सह. निबंधक राजेंद्रकुमार दराडे यांची निवडणूक अधिकारी म्हणून सहकार विभागाच्या प्राधिकरणाने नियुक्ती केली आहे. दराडे यांनी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा बँकेची सभासद संख्या ३ हजार ९३७ आहे, तर ३६३ वैयक्तिक सभासद आहेत. त्यानुसार उद्यापासून जिल्हा बँकेच्या सभासद संस्था, विकास सोसायट्यांच्या प्रतिनिधींचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रतिनिधींचा ठराव ज्या-त्या तालुक्याचे उप अथवा सह. निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे दोन प्रतीत सादर करावे लागणार आहे. ठराव देण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी आहे. संस्थांनी ठराव सादर करताना उपविधीतील तरतुदीचे पालन करून संचालक मंडळाची बैठक बोलाविणे बंधनकारक आहे. या बैठकीतील प्रतिनिधी नेमणुकीचा ठरावच ग्राह्य धरला जाणार असून, एकापेक्षा जादा ठराव केल्यास संबंधित संस्थेच्या सचिव व पदाधिकाऱ्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दराडे यांनी दिला आहे. संस्थेच्या प्रतिनिधीमध्ये बदल करावयाची संधी मिळणार आहे. ज्या संस्थांच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ गठित झाले आहे, अशाच संस्थांच्या ठरावात बदल करून नवीन प्रतिनिधींचे नाव सुचविता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी यंदा सभासदांसोबतच थकित कृषी पतसंस्थांवरही गंडांतर येणार आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सह. निबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी जिल्हा बँकेच्या सभासद असलेल्या प्राथमिक कृषी पतसंस्था थकित असतील तर, अशा संस्थेच्या संचालकांना निवडणुकीसाठी अपात्र ठरविले आहे. या संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखाद्या सदस्याचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्याचा ठराव करून तो पाठवावा, असे ही आदेशात म्हटले आहे.सभासद संख्यासहकारी संस्था : ३९३७व्यक्तिगत : ३६३मतदार यादी कार्यक्रमसभासद संस्थांकडून ठराव मागविणे : २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०१५