शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

‘बांधकाम’च्या रस्त्यांचा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: July 23, 2016 00:14 IST

बांधकाम समिती बैठक : ‘मेडा’ने वीस कोटींचा निधी देण्याची मागणी

सांगली : पवनचक्क्या उभारण्यासाठी साहित्य वाहतुकीमुळे जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील २५ रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या रस्त्यांसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा)ने वीस कोटी ५८ लाखांचा निधी दिला असून तो निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. या निधीतून रस्ते दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या बैठकीत तसा प्रस्ताव आला होता. सर्व सदस्यांनी याला विरोध करून तो फेटाळून लावला आहे. तसेच ‘मेडा’ने तो निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा, अशा मागणीचा ठरावही बांधकाम समितीच्या बैठकीत करण्यात आला.सभापती भाऊसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद बांधकाम समितीची बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी, ‘मेडा’ने आम्हाला रस्ते दुरुस्तीसाठी वीस कोटी ५८ लाखांचा निधी दिला आहे. या निधीतून जत तालुक्यातील १३ रस्ते आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १२ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असून त्यास जिल्हा परिषदेने परवानगी देण्याची मागणी केली. विषयपत्रिकेवरही तसा प्रस्ताव होता. जिल्हा परिषद सदस्यांनी त्या विषयास विरोध केला. तसेच जिल्हा परिषदेचे रस्ते असताना त्यांची दुरूस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी कशासाठी?, असा सवाल केला. ‘मेडा’ने वीस कोटी ५८ लाखांचा निधी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे वर्ग करावा, अशी सदस्यांनी मागणी केली.तसेच कणेगाव (ता. वाळवा) येथील दोन स्वागत तयार करण्यासाठी प्रस्ताव आले आहेत. या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे त्यावर पुढील बैठकीत निर्णय घेण्याचा निर्णय झाला.याचबरोबर जिल्हा नियोजनमधून जिल्हा परिषद ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती व पूल बांधकामासाठीचा निधीही जि. प. बांधकाम विभागाकडेच वर्ग केला पाहिजे, अशी सदस्यांनी मागणी केली. त्यानुसार प्रस्तावित कामांसाठी वीस कोटीपर्यंतचा निधी त्वरित निधी देण्याची सदस्यांनी मागणी केली आहे. यावेळी सदस्य सुरेश मोहिते, छायाताई खरमाटे, उज्ज्वला लांडगे, सुशिला होनमोरे, कार्यकारी अभियंता संजय माळी यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)दहा लाखापर्यंतच्या कामांना ई-निविदा नकोखासदार, आमदार फंडातील तीन लाखांवरील कामे ई-निविदा केली जात होती. यामध्ये शासनाने बदल करून, दहा लाखापर्यंतची कामे ई-निविदाशिवाय होणार आहेत. शासनाचा आमदार आणि खासदारांना वेगळा न्याय आणि जिल्हा परिषद सदस्यांसाठी वेगळा नियम कशासाठी?, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच दहा लाखापर्यंतच्या कामांना ई-निविदामधून वगळण्यात यावे, अशा मागणीचा ठराव केला आहे.$$्निगाळेधारकांवर कारवाई विट्यातील जिल्हा परिषद मालकीच्या १८ गाळेधारकांकडून चार हजार रूपयेप्रमाणे भाडे वसुली होत नाही. गाळेधारक भाडे देत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णयही बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला.