शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्य महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:02 IST

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीसाठी हायटेक प्रचारसाधने उपलब्ध झाली आहेत. मात्र प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्य महागले असून, कापडी झेंडे, टोप्या व अन्य प्रचार साहित्य बाजारात आले आहे. मतदारांची नावे शोधण्यासाठी व मतदान स्लिप मोबाईल मेसेजद्वारे पाठविण्याची सोय असलेल्या मोबाईल अ‍ॅपचा उमेदवारांकडून वापर करण्यात येत आहे.प्रचार पत्रके, झेंडे, ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीसाठी हायटेक प्रचारसाधने उपलब्ध झाली आहेत. मात्र प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्य महागले असून, कापडी झेंडे, टोप्या व अन्य प्रचार साहित्य बाजारात आले आहे. मतदारांची नावे शोधण्यासाठी व मतदान स्लिप मोबाईल मेसेजद्वारे पाठविण्याची सोय असलेल्या मोबाईल अ‍ॅपचा उमेदवारांकडून वापर करण्यात येत आहे.प्रचार पत्रके, झेंडे, टोप्या, मफलर, बिल्ले, महिलांसाठी बिल्ल्यांचा हार, या पारंपरिक प्रचार साहित्यासोबत डमी मतदान यंत्र स्टेज व्हॅन, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅन, एलईडी सायकल डेमो, उमेदवाराचा माहितीपट, सोशल मीडियावर प्रचाराची व्हिडीओ क्लीप, एसएमएसद्वारे व्हॉईस कॉल, मराठी कलाकारांच्या आवाजात उमेदवाराच्या प्रचाराची ध्वनिफीत, पथनाट्य पॅकेज उपलब्ध आहे. प्लास्टिक बंदीमुळे झेंडे, टोप्या, मोटारसायकलवरील झेंडे या प्रचार साहित्यावर संक्रांत आली आहे.पसंती : अ‍ॅपलामहापालिका निवडणुकीसाठी हायटेक प्रचार साधनांचा उमेदवारांकडून वापर सुरू आहे. प्रभागातील मतदारांची नावे, महिला, पुरूष, जात, वय, पत्ता अशा वर्गीकरणाची सोय असलेला मोबाईल अ‍ॅप उपलब्ध झाला आहे. १५ ते ३० हजारापर्यंत किंमत असलेल्या या अ‍ॅपद्वारे मतदारांना मतदान स्लिप मोबाईल मेसेजद्वारे पाठविण्याची सोय आहे. या अ‍ॅपमुळे मतदान केंद्रावर मतदार याद्या घेऊन बसण्याची आवश्यकता राहिलेली नाही. अ‍ॅपमुळे मतदान सुरू असताना मतदान न केलेल्या मतदारांची नावे उमेदवार व समर्थकांना समजणार आहेत. या मोबाईल अ‍ॅपचा उमेदवारांकडून वापर करण्यात येत आहे. गॅस वितरकांकडे असलेली ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची यादीही अ‍ॅपसोबत उमेदवारांना देण्यात येत आहे.कापडाच्या वापरामुळे दरात वाढ झाल्याचे चित्रकापडाच्या वापरामुळे प्रचार साहित्य महागल्याचे विक्रेते शमशोद्दीन बारगीर व सुनील मोतुगडे यांनी सांगितले. मोठ्या सभा व कोपरा सभेसाठी खुर्च्या व ध्वनिक्षेपकाची सोय असलेल्या स्टेज व्हॅनचे प्रति दिवस १२ हजार रुपये, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅनचे प्रति दिवस १० हजार रुपये भाडे आहे. उमेदवाराच्या एलईडी दिव्यांची सोय असलेल्या डेमो सायकलची सुमारे १० हजार रुपये किंमत आहे. उमेदवाराच्या प्रचाराचा ३० मिनिटांचा माहितीपट तयार करण्यासाठी १ लाख रुपये खर्च आहे. ८ रूपयांपासून ६० रूपयांपर्यंत झेंडे, बिल्ल्यांचा हार २० रुपये, डमी मतदान यंत्र ४०० रुपये, मफलर ३० रुपये अशा प्रचार साहित्याच्या किमती आहेत.प्रचार खर्चाची होणार कागदोपत्री कसरत...अ‍ॅपद्वारे उमेदवार मतदारांच्या मोबाईलवर पोहोचणार असले तरी, अडाणी, अशिक्षित व स्मार्ट फोन नसलेल्या मतदारांसाठी प्रचार पत्रके व मतदान स्लिपांचा वापर करावा लागणार आहे. महापालिका निवडणुकीत प्रथमच हायटेक प्रचार साधनांचा वापर होणार आहे. मात्र महागड्या हायटेक प्रचार साधनांचा वापर करणाऱ्या उमेदवारांना ५ लाख रुपये निवडणूक प्रचार खर्चाची मर्यादा न ओलांडण्याची कागदोपत्री कसरत करावी लागणार आहे.