शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी पोर्टलचा व्यावसायिकांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:09 IST

सांगली : जीएसटी रिटर्न्स भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात जीएसटी पोर्टल मंदावले. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो व्यावसायिकांची रिटर्न्स मुदतीत जमा होऊ ...

सांगली : जीएसटी रिटर्न्स भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात जीएसटी पोर्टल मंदावले. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो व्यावसायिकांची रिटर्न्स मुदतीत जमा होऊ शकली नाहीत. त्यांना आता दंडासह ती जमा करावी लागतील. दरम्यान, पोर्टल मंदावल्याची तक्रार जीएसटी विभागाने फेटाळली आहे.आॅक्टोबरचे जीएसटी रिटर्न्स भरण्यासाठी वीस नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. सर्रास व्यावसायिक प्रत्येक महिन्यात मुदतीच्या शेवटच्या तीन-चार दिवसांत रिटर्न्स जमा करतात. या महिन्यात पोर्टलवर प्रचंड ताण येऊन ते मंदावले. १८, १९ आणि २० नोव्हेंबर या तीन दिवसात पोर्टलवर रिटर्न्स अपेक्षित गतीने जमा करता आली नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. सायंकाळी पोर्टल बंद होईपर्यंत अनेकांची रिटर्न्स जमा होऊ शकली नाहीत. आता त्यांना दंडासह ती जमा करावी लागतील. महिन्याभराची उलाढाल शून्य असेल, तर वीस रुपये दंड होईल. उलाढाल झाली असेल, तर पन्नास रुपये भरावे लागतील. पोर्टल मंदावल्याचा नाहक भुर्दंड व्यावसायिकांना भरावा लागेल.दरम्यान, पोर्टल मंदावल्याची तक्रार जीएसटी विभागाने फेटाळली आहे. केंद्रीय जीएसटीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १९ नोव्हेंबररोजी साडेअकरा लाख रिटर्न्स फाईल झाल्या आहेत. पोर्टलवर सर्वोच्च ताण असल्याच्या काळातही १ लाख ८२ हजार रिटर्न्स भरली गेली आहेत. २० नोव्हेंबररोजी दुपारी चार वाजेपर्यंत ९ लाख २३ हजारांपेक्षा अधिक जमा झाली. एकाचवेळी दीड लाख रिटर्न्स फाईल्स करुन घेण्याची पोर्टलची क्षमता आहे. बुधवारी (दि. २०) दुपारी चारपर्यंत ५५ लाख ७९ हजारांपेक्षा जास्त प्रकरणे देशभरात जमा झाली आहेत. पोर्टल मंदावले असते तर इतकी प्रकरणे जमा झाली नसती. तरीही करदात्यांनी शेवटच्या दोन-तीन दिवसांपर्यंत न थांबता लवकर जमा करावीत.दरम्यान, गतवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये भरलेल्या एकूण प्रकरणांच्या तब्बल निम्मी प्रकरणे गेल्या दोन दिवसात एकाचवेळी भरली गेल्याने हा ताण आला असल्याचे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.